गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-
यावर्षी झालेल्या सततच्या पावसामुळे व सोयाबीन पिकावर आलेल्या रोगराईमुळे सोयाबीन पिकावर प्रचंड परिणाम होऊन उत्पादन अत्यंत कमी होत आहे. आता चालू असलेल्या सोयाबीन काढनी दरम्यान लक्षात येते की, एकरी ५० किलो ते २ क्विंटल सोयाबीन उत्पन्न होत आहे. या उत्पादनात शेतकऱ्यांचा शेतीसाठी लागलेला खर्च सुद्धा निघत नाही. गेल्या कित्येक वर्षापासून नापिकीमुळे शेतकरी आधीच मेटाकुटिला आलेला आहे. यावर्षी सुद्धा सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकार्यांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत व पिकवीमा मंजूर होने आवश्यक आहे. सोयाबीन उत्पादक शेतकार्यांना नैसर्गीक आपत्ती कायद्या अंतर्गत तात्काळ आर्थिक मदत जाहिर करावी. तसेच पिक वीमा मंजूर करण्यात यावा. त्यासाठी महसूल विभागाने कोणत्याही पिकवीमा कंपनीच्या दबावाखाली न येता शेतकार्यांना विश्वासात घेऊन वस्तुनिष्ठ पिक कापनी अहवाल शासनाला द्यावा. यासाठी आम्ही शेतकार्यांच्या पाठीशी खंबीरपने उभे आहोत याची संबंधीतांनी नोंद घ्यावी. तसेच मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे वडगाव पाटण शिवारातील कांदा व केळी पिकांचे पंचनामे होऊन सुद्धा त्यांना कुठलीही आर्थिक मदत अद्याप पर्यंत मिळालेली नाही. ती आर्थिक मदत सुद्धा तात्काळ मंजूर करण्यात यावी अश्या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार जळगाव जामोद यांच्या मार्फत देण्यात आले. महसूल विभागाने पिकवीमा कंपनीसोबत लागे बंधे करत शेतकर्यांना फसवन्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी तंबी यावेळी प्रसेनजीत पाटिल यांनी तहसीलदार यांच्यामार्फत महसूल विभागाला दिली. सदर निवेदनावर कापूस पणन महासंघाचे संचालक प्रसेनजीत पाटिल, रंगरावबाप्पू देशमुख, शिवाजीराव वाघ, राजूबाप्पू देशमुख,बंडू पा. वाघ,संजय देशमुख, adv मोहसीन खान,अजहर देशमुख,मंगल डोंगरदिवे,ईरफान शेट्टी,आशिष वायझोड़े, सिद्धार्थ हेलोडे, अमोल दाभाड़े,विजय वाघ, जावेद खान, मोहजीर मौलाना,ईमरान खान,शाहिद कुरेशी,ताहेर, सुरेश पाचपोर,तुकाराम वाघ,अरुण बावस्कार, आकाश जाने,शिवाजी सारोकार,निजाम राज,विलास कड, भागवत अवचार,राहुल मानकर, पांडुरंग घोंगे, अनंता जवंजाळ, भावसिंग सोलंके,हरिभाऊ खुमकर, पुंडलिक पटागे,गोपाल नाईक, प्रवीण सित्रे वासुदेव वायझोड़े, अंबादास मेहसरे, रविन्द्र तायड़े, सतीष डोंगरदिवे यांच्या सह शेकडो लोकांच्या सह्या आहेत.