वैजापूर न्यायालयासमोर भरदिवसा चाकूने भोसकून खून

 

 

ऋषी जुंधारे
तालुका प्रतिनिधी
वैजापूर

वैजापूर दि०३: वैजापूर शेतजमिनीच्या वादातून पती, मुलगा व नातवाच्या मदतीने पहिल्या पत्नीचा न्यायालयासमोर सकाळी अकरा वाजता चाकूने भोसकून खून केला.या प्रकरणी पतील पोलिसांनी अटक केली असून अन्य तिघे फरार झाले.
या बाबतची माहिती अशी की, केशरबाई कारभारी गवळी (७५) रा.भिंगी बोरसर यांचे पती कारभारी गवळी रा. घायगाव यांच्याशी लग्न झालेले होते. पण त्यानंतर दोघांचे पटत नसल्याने केशरबाई गवळी या भिंगी बोरसर येथे मुलीकडे राहत होत्या.कारभारी किसन गवळी(७०)हे दुसऱ्या पत्नीसह घायगाव येथे राहत होते. केशरबाई आणि कारभारी यांच्यात चाळीस वर्षापासून शेत जमिनीच्या वादावरून न्यायलायात खटला चालू होता. दि ०३ रोजी न्यायलायात तारीख असल्याने केशरबाई सकाळी ११वाजता न्यायालयात तारखेसाठी आल्या होत्या. न्यायालयासमोरून जात असताना कारभारी किसन गवळी(८०),त्यांचा मुलगा भरत कारभारी गवळी (४०), अतुल भरत गवळी(२२) व अन्य एकजण यांनी केशरबाईला गाठले व चाकूने सहा ते सात वेळेस भोसकले.त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना पोलिसांनी तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.या प्रकरणी पोलिसांनी पती कारभारी गवळी याला अटक केली. तर अन्य तिघे फरार झाले .पोलीस त्यांचा शोध घेत आहेत आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सूर्या मराठी न्युज साठी ऋषी जुंधारे वैजापूर

Leave a Comment