2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 

त्याच बरोबर केंद्र सरकारने शेतकरी संदर्भात आवाजी मतदानाने कोणालाही, कोणत्याही घटक पक्षांना अथवा विरोधी पक्षांच्या खासदारांना विश्वासात न घेता बिल संमत केले सदरहू बिल हे शेतकरी विरोधी असून यामुळे भारतातील शेतकरी एक कामगार म्हणून राहील शेतीव्यवसाय पूर्णता कंपनीच्या ताब्यात जाऊन शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव मिळणार नाही .कारण सदर बिल अंतर्गत बाजार समिती बरखास्त करण्याचा डाव केंद्रशासनाने केला आहे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेती व्यवसाय व त्यावर निर्भर असणारे शेतकरी हे पूर्णतः वेठबिगारी सारखे जीवन झाल्याशिवाय राहणार नाही. सदर बिल केंद्र शासनाने त्वरित मागे घ्यावे त्याचबरोबर उत्तर प्रदेशामध्ये मनीषा वाल्मिकी या तरुणीवर अत्याचार करून तिचा अमानुष हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेश पोलिसांनी अत्याचारित तरुणीचा मृतदेह त्यांना त्यांच्या नातेवाईकांना न देता परस्पर अंतिम संस्कार तेही रात्री अडीच- तीनच्या दरम्यान करून घेतले ही बाब निंदनीय असून असंतोष पसरवणारी आहे या घटनेचा आम्ही तीव्र निषेध नोंदवित आहोत. अत्याचारीत तरुणीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना अडवून त्यांच्यावर पोलिसांनी हल्ला केला सदर बाब ही भारतीय नागरिकांची स्वतंत्रता हिरावून घेण्यासारखी आहे उत्तर प्रदेश सरकारचा तथा पोलीस प्रशासनाचा आम्ही तीव्र निषेध नोंदवित आहोत वरील तीन बाबीसाठी तालुका व शहर काँग्रेस कमिटी संग्रामपूर च्या वतीने संग्रामपूर येथे धरणे आंदोलन आयोजित केले होते यासाठी पक्षनेत्या स्वातीताई वाकेकर मुख्य समन्वयक अशोक ब्राह्मणे पक्ष निरीक्षक कैलास देशमुख शैलेंद्र पाटील राजेंद्र वानखडे सय्यद आसिफ तेजराव मारोडे मनोहर बोराखडे संतोष राजनकर संजय ढगे अभय मारणे हरिभाऊ राजनकर सुरेश आगे आगे मिर्झा सतीश पाटील बबलू पाटील श्रीकृष्ण दातार राजेश्वर देशमुख विनायक ठाकरे राजू राठोड संतोष टाकळकर सिद्धी कुरेशी जावेद अली यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Comment