वैजापुर गंगापुर विधानसभा मतदार संघातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिंकाचे पंचनामे करा – राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी

 

ऋषी जुंधारे
तालुका प्रतिनिधी
वैजापूर

संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे थैमान घातले असुन त्यांची झळ आपल्या वैजापुर गंगापुर विधानसभा मतदार संघात देखील मोठ्या प्रमाणात जाणवत असून शेतकर्याची पेरणी झालेली कापुस, बाजरी, मका, भुईमूग, सोयाबीन, तुर, मुग, ऊस, कांदा, फळबागा आदी पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे त्या मुळे शेतकर्या चे प्रचंड अर्थीक नुकसान झाले असुन हाताशी आलेले पिक निघून जाण्याची वेळ शेतकर्या वर आलेली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व पिकांचे कुठलेही निकष न लावता सरसकट पंचनामे करण्यासाठी संबंधित विमा प्रतिनिधी, महसूल यत्रंना, कृषी विभाग यांना आदेश द्यावे..
शेतकर्याना त्वरीत हेकट्ररी रुपये 50000/_ हजार रुपये चे नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी तसेच शेतकर्या नी भरलेल्या पिकविम्याची रक्कम मिळण्यासाठी संबंधित विमा कंपनीच्या प्रतिनिधी नी नुकसानीची तीव्रता लक्षात घेता पिक विमा मंजूर करण्यास आदेश द्यावे जेणेकरून शेतकर्या ना आर्थीक अडचणीतून सावरण्यास मदत होईल असे निवेदन वैजापूर तहसीलदार श्री निखिल धुळधर यांना देण्यात आले या वेळी माजी आमदार भाऊसाहेब( तात्या) पाटील चिकटगावकर ,जिल्हा कार्यअध्यक्ष अभय दादा पाटील चिकटगावकर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अॅड. प्रतापराव निबांळकर साहेब, पंचायत समिती उपसभापती राजेंद्र नाना मगर, तालुका कार्यअध्यक्ष उत्तम काका निकम,शहर अध्यक्ष प्रेमभाऊ राजपुत, खरेदी विक्री संघ चे संचालक मंजाहारी पाटील गाढे, माजी तालुका अध्यक्ष बाळासाहेब भोसले, रवींद्र पाटणे,संदिप पवार, बाळुपाटील शेळके ,सागर भाऊ गायकवाड, बापु भाऊ साळुंके , अॅड. प्रदीप चंदने, विश्वात्मक कुहिले, शरद बोरणारे, प्रशांत शिंदे,राहुल साळुंखे ,दादाभाऊ गायकवाड, अविनाश रोकडे, शैलेश निखाडे ,सम्राट राजपुत, यांची उपस्थिती होती…

Leave a Comment