वन विभागाकडे मोठे आव्हान बिबट्या करतोय रोजच शिकार

0
325

 

दहीगाव परीसरातील नागरिक भयभीत

बिबट्या पकडण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना अपयश

तालुका प्रतिनीधी : (अमोल जवंजाळ  तेल्हारा

तालुक्यातील दहिगाव शिवारात गेल्या काही दिवसापासून बिबट्या मुक्त संचार करत आहे मागील दोन दिवसात बिबट्या ने दोन हरीण, ‌एका मोराची शिकार केली असून वन विभागाने बिबट्या च्या शोधार्थ CC TV कॅमेरे लावण्यात आले मात्र वन विभागाला तुरी देऊन बिबट्या आपले स्थळ बदलत आहे त्यामुळे बिबट्या नेमका कुठे आहे याची भीती परिसरात पसरली असून नागरिक कामाला सुद्धा जात नसल्याने शेतीची फार मोठी हानी होत आहे.वन विभागाने तात्काळ ड्रोन कॅमेरे बोलावून शोध मोहिमेस गती द्यावी नाहीतर मनुष्य हानी सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही बिबट्या लोकेशन च्या काही अंतरावरच गाव वस्ती असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत मात्र वन विभागा कडुन‌‌ अजुन ठोस कारवाई अजून केल्याचे दिसत नाही.
याआधी सुद्धा तेल्हारा तालुक्यातील चितलवाडी ह्या गावात बिबट्या ने थैमान घातले होते व बिबट्या कोरड्या विहिरीत पडला होता वन विभागाने रात्र भर प्रयत्न करून सुद्धा बिबट्या पिंजऱ्यात न येता वन अधिकाऱ्यांना चुना लावून गेला असल्याने नागरिकांमध्ये वन विभाग चर्चेचा विषय बनला आहे. तरी हा बिबट्या पकडण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश मिळेल का असा प्रश्न जनतेला उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here