शेतकरी विरोधी अध्यादेश बाबद तीव्र निदर्शन आंदोलन

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

जळगांव (जा) :- अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने संपूर्ण भारतात दिनांक 25 सप्टेंबर 2020 ला आंदोलन करण्यात आली.त्याच संदर्भाने अखिल भारतीय किसान सभा जळगांव जामोद तालुकाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड मोठी नारेबाजी करीत तालुक्यातील शेतकरी वर्गाने निदर्शने केली.सरकारने पारित केलेल्या 3 विधेयकाला किसान सभेचा विरोध असून सरकारने तंबोलतोब हे विधेयक वापीस घ्यावे.सदर अध्यादेश हा शेतकरी,शेतमजूर लोकांना देशोधडीला लावणारा असल्याचे मत किसान सभेची भूमिका आहे.तालुक्यातील शेकडीच्या प्रमाणात शेतकरी लाल झेंड्याखाली एकत्रित झाले होते. मोदी सरकार निक्कमी है! ये सरकार बदलनी है! च्या नाऱ्यानी परिसर दणाणून सोडला होता. मोदी सरकारने जीवनावश्यक वस्तूच्या यादीतील तांदूळ,धान्य,तेल,बटाटा काढले. त्यामुळे भांडवलदार लोक या धोरणाने प्रचंड साठाबाजी करून भविष्यात जनतेची लूटमार होईल.गोरगरीब जनता अन्नधानच्या कमतरतेचा फटका बसून उपासमारीची वेळ सहन करेल.
कृषी उत्पन्न बाजार समिती हे लहान लहान अडते-व्यापारी जवळपास च्या शेतकरी वर्गाचा माल विकत घेतात.मात्र नवीन विधेयकामुळे लहान शेतकरी भांडवलदार व्यापाऱ्याच्या कचाट्यात सापडून आपला माल बेभाव विकण्यासाठी मजबूर होईल.तसेच कंत्राटी शेती पद्धतीने शेतकरी हा मालक न राहता कंपनी चा गुलाम होईल.देश रसातळाला घेऊन जाण्याचा हा प्रयत्न आहे का? अश्या अनेक प्रश्नाला जन्म देणारे हे 3 शेतकरी विधेयक मागे घ्या.ह्यासाठी जळगांव जामोद येथे मोठे आंदोलन पार पडले.या आंदोलनात ग्रामीण भागातील सर्व स्तरातील शेतकरी हजर होते, प्रामुख्याने आदिवासी शेतकऱ्यांनी हिराहरीने भाग घेत,मोदी सरकारच्या या धोरणाचा निषेध केला.सदर निवेदनावर किसान सभेचे जिल्हाउपाध्यक्ष कॉम्रेड रामेश्वर काळे ,कॉम्रेड विजय पोहनकर, प्रसेनजित दादा विचारमंचाचे अध्यक्ष अजहर देशमुख,शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अनंता बकाल,अभय मारोडे,शिवाजीराव वाघ,कैलास भगत,प्रकाश महल्ले, विलास हिराळकर,प्रकाश सातव ,किसन भैड्या,श्रीराम भैड्या इत्यादी शेतकरी वर्गाच्या शेकडो साह्य आहेत.

Leave a Comment