मास्क न लावणाऱ्यांना बसणार ५०० रुपये दंड

0
264

 

गोंदिया: जिल्ह्यात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनाच्या प्रकोपावर नियंत्रण मिळविण्यासाठी कडक पावले उचला, असे निर्देश पालकमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. तसेच मास्क न घालता घराबाहेर फिरणाऱ्यांवर आता २०० ऐवजी ५०० रुपये दंड करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्याचा डब्लींग रेट व रिकव्हर रेट फार कमी आहे. यासाठी टेस्टींग वाढविल्या पाहिजे. कोविड प्रायव्हेट दवाखान्यात जिल्हा प्रशासनाचा अधिकारी ठेवावा. काही अडचणी आल्यास पोलीस विभागाची मदत घेण्यात यावी. नागरिकांनी मास्क वापरले नाही तर त्यांच्यावर आता 500 रुपये दंड आकारण्यात यावा. कोविड-19 संसर्गापासून स्वत:ला व आपल्या कुटूंबाला वाचविण्यासाठी सतत मास्कचा वापर करावा. मास्कशिवाय घराबाहेर पडू नये. सार्वजनिक ठिकाणी किमान दोन मीटरचे शारिरीक अंतर राखून नियमाचे पालन करा. हात वारंवार धुवा. हात धुण्याची सोय नसलेल्या ठिकाणी उदा. प्रवासात सॅनिटायजरचा वापर करावा. नाक, तोंड, डोळे यांना वारंवार स्पर्श करणे टाळावे. ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून तपासणी करावी. मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार असल्यास दररोज तापमान मोजावे. डॉक्टरांकडून नियमीत तपासणी करुन घ्यावी असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी खासदार प्रफुल पटेल, आरोग्यमंत्री राजेश टोपे,आमदार सर्वश्री विनोद अग्रवाल, मनोहरराव चंद्रिकापुरे, सहेषराम कोरोटे, राजू कारेमोरे, प्रकाश गजभिये, माजी खासदार डॉ.खुलाल बोपचे, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, आरोग्य संचालक डॉ.अर्चना पाटील, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी आरोग्य उपसंचालक डॉ.संजीव जयस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.नरेश तिरपुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भूषणकुमार रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे,उपजिल्हाधिकारी राहुल खांदेभराड,जिल्हा विज्ञान सूचना अधिकारी पंकज गजभिये, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, डॉ.हिंमत मेश्राम, डॉ.वेदप्रकाश चौरागडे, गोंदिया उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, अर्जुनी/मोरगाव उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसिलदार राजेश भांडारकर, अपर तहसिलदार अनिल खडतकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here