गावठाण मध्ये विद्युत पुरवठा करणाऱा ट्रांसफार्मर जळाल्याने तो लवकरात लवकर बसवा अशी विनंती करण्यासाठी गेलेल्या लोकांवरच लीगल कनेक्शन असताना मोटारीचा विद्युत पुरवठा केला बंद.

 

 

ज्यु.ईजी.ची आकसापोटी कार्यवाही.

गावातील समस्या माडंणे झाला गुन्हा.

 

सोनोशी…………. चार दिवसांपुर्वी सोनोशी येथील मागास्वर्गिय लोक वस्तिला विद्युत पुरवठा करणारा ट्रांसफार्मर जळालेल्या होता. गावठाण फिडर चा ट्रांसफार्मर लवकरात लवकर बसवा व अवैध कनेक्शन काढण्याची मागणी केल्यामुळे ज्युनियर इंजिनिअर्स गायकवाड याचा राग अनावर झाला व दुस-या दिवशी आकसापोटी विनंती करण्यासाठी गेलेल्या लोकमत वृत्त पत्राचे पत्रकार महेंद्र मोरे व ग्राहकांच्या घरी नाहक धाडी टाकून कारवाईच्या धमक्या दिल्या व त्याची हरासमेट करण्याचा प्रयत्न केला. याच लोकांचे सर्व लीगल कनेक्शन असताना शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या मोटार पंपाचे कनेक्शन तोडले.त्यामुळे विद्युत वितरण कंपनीचे अधीकार्याची मुजोरी समोर आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याशी काही कार्यकर्त्यांनी संपर्क करून ट्रांसफार्मर लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न केला व तो विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बसवला 4 घंटे चार्जझाल्यानंतरही गावामध्ये विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही तसेच विद्युत पुरवठा कमी दाबाचा दिला गेला याबद्दल ग्राहकांनी जूनियर इंजीनियर गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जर अधिकारी ग्राहकांशी उद्धटपणे वाजत असेल तर ग्राहकांनी दाद कोणाकडे मागायची हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. अर्धवट माहितीच्या आधारे ग्राहकावर आकसापोटी महावितरणचे कर्मचारी व अधिकारी जर सुड बुद्धीने कारवाई करत असतील तर अशा अधिकाऱ्यांवर कार्यवाही होणे आता गरजेचे झाले आहे. सोनोशी मध्ये सतत विद्युत पुरवठा हा सुरळीत चालत नाही कमी दाबाची वीज दिल्या जाते लोड वितरण ही व्यवस्थित केल्या जात नाही रात्र-रात्र लाईट बंद असते डीपी चा साधा फ्यूज टाकण्यासाठी कर्मचारी हजर राहत नाही असा त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे. अशावेळी गावातील ग्राहक जर वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आपली मागणी मांडत असेल तर त्यांच्यावर कारवाईच्या नावाखाली नाहक त्रास दिला जात आहे. कोणतीही माहिती न घेता व सर्व काही लिगल असतानां विनंती करण्यासाठी गेलेल्या लोकांसह पत्रकारावर सुडबुध्दीने कनेक्शन कापणे हा कोणता न्याय.त्यामुळे अशा अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आता होत आहे.

 

सोनोशी येथील मागासवर्गीय वस्तीत विद्युत पुरवठा करणारा ट्रांसफार्मर जळाला होता.तो ट्रा्सफारमर लवकर बसवा.व सुरू करा अशी विनंती मी गायकवाड साहेब यांच्या कडे केली .पण उलट त्यांनी मलाच दमदाटी केली गावचा प्रश्न तिकडे च सोडवा.अशी उत्तरे दिली .व दुसर्यादिवशी येवुन माझे लिगल असलेले शेतातील मोटारीचे कनेक्शन कट केले.

महेंद्र मोरे सोनोशी

गावात विद्युत पुरवठा हा खुप विस्कटलेला आहे लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या पत्रकार व ग्राहकांना जर अशे अधीकारी मुस्खटदाबी करीत असेल तर यांची तक्रार मा.पालकमंत्री डॉ.शिगंणे साहेब व ऊर्जा मंत्री कडे करणार आहे.

पांडुरंग सोळुंके.
ता. उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस सिंदखेडराजा
संचालक खरेदी विक्री संघ सिंदखेडराजा.

Leave a Comment