80 फुट खोल विहिर 70 फुट पाणी तरी मृत्यु देह बाहर काढन्यास यश

 

मुख्य संपादक

अनिलसिग चव्हाण

 

अकोला, अकोला येथे मृत्यु देह सोधन्या करिता चक्क एका 80 फूट खोल विहिरीतून युवकाचा मृतूदेह शोधण्यास आपत्कालीन पथकाला यश आलं आहे. रुपेश तायडे यांची येथील एका शेतातील विहीरी जवळ चप्पल आणी तंबाखूची पुडी दीसुन आल्याने याच विहरीत यांचा मृतदेह असल्याच्या संशयावरुन नातेवाईकांनी विहीरीत गळ टाकुन शोध घेतला परंतु काही मिळुन आले नाही. नंतर नातेवाईकांनी वाडेगाव पोलीस चौकीत धाव घेतली आणी माहिती दीली लगेच वाडेगाव चौकीचे एपीआय पडघन यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन राबविण्यासाठी पाचारण केले. लगेच जिवरक्षक दीपक सदाफळे यांनी आपले सहकारी धिरज आटेकर,अंकुश सदाफळे, मयुर सळेदार,ऋषीकेश तायडे,ऋतीक सदाफळे, गोविंदा ढोके,आणी शोध व बचाव साहित्य आणी रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दुपारी 3:30 वाजता पोहचले आणी सर्च ऑपरेशन चालु केले.
विहीरीत कपारी असल्याने आणी 80 फुट खोल यात 70 फुट पाणी असल्याने सर्च ऑपरेशनला अडथळे निर्माण होत होते.शेवटी चार तासानंतर रुपेश तायडे यांचा मृतदेह रात्री 6:45 शोधुन बाहेर काढला.

Leave a Comment