सचिव यांना निलंबित करण्याची मागणी -डॉ.ज्ञानेश्वर टाले
आज दिनांक 11 सप्टेंबर 2020 रोजी पंचायत समिती मेहकर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात केली व तब्बल एक वर्षापासून मौजे हिवरा खुर्द येथील विविध कामांची व्यापारी गाळे रोहयो मधील कामाचा भ्रष्टाचार तसेच मजुरांची मजुरी न देणे इतर निवेदनाच्या मुद्याच्या अनुषंगाने घरकुलाचे मजुरी न देणे ग्राम रोजगार सेवक तसेच ग्रामपंचायत सचिव यांनी आपलं कर्तव्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे सदर मजुरांना त्यांच्या कामाचे हक्काचे त्याचे पैसे मिळाले नाही. ग्रामपंचायत स्तरावर संबंधित सचिव ग्राम रोजगार सेवक यांनी मस्टर नोंदवून घेऊन हजेरी नोंद घेऊन रेकॉर्ड करून ठेवावे व पंचायत समिती एमआरजीएस विभागाला सादर करणे आवश्यक असते. सदर काम हे प्रशासकीय काम असून सचिव व ग्रामरोजगार सेवकांचे असते तरीसुद्धा याबाबत वेळोवेळी गटविकास अधिकारी मेहकर जिल्हाधिकारी बुलढाणा मुख्य अधिकारी जि.प.बुलढाणा यांना वारंवार लेखी कळवून सुद्धा अध्यापर्यंत संबंधित प्रकरणाची कुठेही चौकशी गटविकास अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आली नाही यामध्ये उपमुख्यकार्यकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांनी दिनांक १२. ७. २०२० रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती मेहकर यांना आदेश दिले होते. की संबंधित मुद्द्यांची तात्काळ चौकशी करून नियमानुसार योग्य ती कारवाई करून तसा अहवाल आपल्या स्वयस्पष्ट अभिप्रायासह शासनाकडे सात दिवसाच्या आत सादर करावा तरीदेखील अद्यापपर्यंत या प्रकरणात साधे पत्र सुद्धा काढण्यात आलेले नाही. व कुठलीही चौकशी करण्यात आली नाही म्हणून संबंधित प्रशासन सचिव ग्राम रोजगार सेवक यांना पाठीशी तर घालत नाही ना अशी शंका मजुरांमध्ये व गावकर्यांच्या मनात निर्माण होत आहे. मात्र आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डाॕ. ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वात पंचायत समिती मेहकर येथे आक्रमक पवित्रा घेत जोपर्यंत ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत आमची भूमिका कायम राहील असा आक्रमक पवित्रा घेतला यावेळी संबंधित प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली व सदर सचिव यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी सुद्धा करण्यात आली. कारवाईचे पत्र घेतल्याशिवाय येथून उठणार नाही अशी भूमिका स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली यामध्ये सभापती निंबाजी पांडव, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री गजानन पाटोळे, विस्ताराधिकारी श्री गवई. यांनी प्रमुख शिष्टमंडळाशी चर्चा करुन प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला. माञ यामध्ये प्रशासनाने ठोस कारवाई करण्याची भूमिका घ्यावी भूमिकेवर आम्ही ठाम असून जोपर्यंत ठोस कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही मैदान सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा स्वाभिमानीच्या व मजुरांच्या वतीने घेण्यात आला व सचिव यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही या प्रसंगी कारवाई मागण्यासाठी आम्ही मागेपुढे पाहणार नाही. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले तालुका अध्यक्ष प्रफुल देशमुख, पक्षाचे तालुकाध्यक्ष नितीन अग्रवाल, अल्पसंख्यांक आघाडीचे तालुकाध्यक्ष अफरोज शहा, शहराध्यक्ष सदाशिव वडुळकर, उपशहर अध्यक्ष गणेश मोरे अल्पसंख्यांक आघाडीचे शहराध्यक्ष अश्फाक शहा, कैलास ऊतपुरे,भीमराव खरात, राजकिरण ऊतपुरे, तुकाराम खाडे, सुरेश खरात, मिथुन साळवे, गौतम सदावर्ते, देवकाबाई उत्तरे, मंगला डोंगरदिवे, सुभद्रा वानखेडे, वैशाली खरात, लता होगे, कमलबाई शिरे, शोभाबाई गवई,निर्मला अंभोरे, कमलबाई दानवे.मजुर,व कार्यकर्त्ते उपस्थित होते.