आशिया खंडातील मुलींच्या पहिल्या शाळेला “राष्ट्रीय स्मारक” घोषित करा…

 

 

अन्यथा आई सावित्रीमाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती , महात्मा फुले ब्रिगेड, फुलेंप्रेमी व विविध संघटना कडून आंदोलनाचा इशारा….

अडगांव बु प्रतिनिधी :दिपक रेळे

 

तेल्हारा दि. 8 सप्टेंबर , २०२० गुरुवार रोजी अशिया खंडातील मुलींची पहीली शाळा वाचविण्यासाठी व राष्ट्रीय स्मारक घोषीत करावे यासाठी “आई सावित्रीमाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती, महात्मा फुले ब्रिगेड ,समस्त फुले प्रेमी वतीने मा. तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व माई सावित्रीआई फुले यांनी सुरू केलेल्या देशातील पहीली मुलींची शाळा भिडेवाडा पुणे हे ठिकाण शासनाने तात्काळ भूसंपादीत करून “राष्ट्रीय स्मारक ” म्हणुन घोषीत करून विकसीत करावे देशातीलच नव्हे तर संपुर्ण आशिया खंडातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा प्रसिद्ध आहे. राष्ट्रपिता – सत्यशोधक – तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांनी १ जानेवारी , १८४८ साली मुलींची पहिली शाळा सुरू केली व ज्ञानाची गंगा दारोदारी पोहचविली. ज्या फुले दाम्पत्यांनी अनेक अडी- अडचणींचा सामना करून , शेण – माती – चिखल विरोध पत्करून बहुजनांसाठी शिक्षणाची कवाडे उघडी केली.आज त्या भिडेवाड्यातील शाळेची अवस्था खुपच दयनीय झालेली आहे. हे तमाम फुले प्रेमींसाठी वेदनादायक आहे
सदरील जागा शासनाने लवकरात लवकर भूसंपादीत करून त्या वास्तुला राष्ट्रीय स्मारक म्हणुन घोषीत करून विकसीत करावे अन्यथा शासनाच्या विरोधात संपुर्ण महाराष्ट्रात ” आईसावित्री माई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती व समस्त फुले प्रेमीं “च्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल यांची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी……

मा. तहसीलदार साहेबांना निवेदन देतांना महात्मा फुले ब्रिगेड व आईसवित्री माई फुले स्मारक संघर्ष समिती द्वारे अजय दादा बंड यांचा नेतुरत्वात निवेदन देण्यात आले त्या वेळी मार्गदर्शक म्हणून लखनदादा राजनकार, गजाननभाऊ उंबरकार, महेंद्र भोपळे यांचा मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले.
महात्मा फुले ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अजय बंड़, ऋषिकेश निमकर्डे(तालुका अध्यक्ष) रोशनभाऊ बोंबटकार( ता.उपाअध्यक्ष)
अनंता निमकर्डे, सोनुभाऊ भड, वैभवभाऊ राऊत, गोपालभाऊ बंड, स्वप्नील झगडे,प्रशांत रत्नपारखी,विनोद अढाउ, गणेश लाघे, विद्याधर भारसाकले, उमेश राखोंडे, प्रफुल आमले,सचिन तायडे,प्रशांत उमाळे,अनिल इंगळे,धीरज लोणकर गणेश भाऊ इंगोले,श्रीकृष्ण कवर सह
समस्त फुलेप्रेमी उपस्थित होते. सदर निवेदन शासनाच्या नियमात राहुन , मास्क लावुन देण्यात आले.

Leave a Comment