गजानन सोनटक्के जळगाव जा
जळगाव जामोद तालुक्यात कोरोणा चा संसर्ग वाढत असताना ग्रामीण भागात कोरोणाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे असेच ग्रामपंचायत सूनगाव अंतर्गत येत असलेल्या ग्राम उसरा बु येथे कोरोनाचा शिरकाव झालेला आहे 7ऑगस्ट रोजी आलेल्या एका 40 वर्षीय पुरुष रिपोर्ट कोरोना बाधित आल्याने उसरा येथील जनतेत भीतीचे वातावरण आहे ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या वतीने रुग्ण राहत असलेला परिसर सील करण्यात आला आहे व उसरा येथील जनतेने विनाकारण बाहेर फिरू नये व फिरताना तोंडाला मास्क बांधावे असे सुनगाव ग्रामपंचायतीच्या वतीने उसरा येथील नागरिकांना संदेश दिला आहे