अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना च्या वतीने मुक्काम आंदोलन- डाॕ टाले
मेहकर– शासनाने निराधार व गोरगरिबांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत मात्र संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे अनेक लाभार्थी अनुदानापासून वंचित राहत आहेत त्यामुळे निराधार व गोरगरीब लाभार्थ्यांचे अनुदान तात्काळ जमा करा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संबंधित कार्यालयात मुक्काम आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आला आहे यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतिने तहसिलदार डाॕ.संजय गरकल यांना जिल्हाअध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वामध्ये निवेदन देण्यात आले. गेल्या दोन महिन्यांपासुन दिव्यांग, निराधार,श्रावण बाळ,विधवा,व इतर लाभार्थींचे,जुलै,आॕगस्ट,२०२० चे अनुदान अध्यापपंर्यत त्यांच्या खात्यावर पाठविण्यात आले नाही. सदर कार्यालयाचा कारभार अत्यंत खराब झालेला आहे आपण त्याअनुषगांने नियंत्रण ठेवावे सदर लाभार्थी हे वारंवार आपल्या कार्यालयाकडे चौकशी साठी चकरा मारत असतात माञ त्यांना आपल्या कार्यालयातील लिपीक,कर्मचारी व्यवस्थित पणे माहीती सुध्दा देत नाहीत.बरेच लाभार्थींच्या तक्रारी आमच्याकडे आल्यामुळे याबाबतीत तहसिलदार मेहकर यांचीभेट घेऊन सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. व सदर लाभार्थी अत्यंत वाईट परिस्थितीत आहेत सध्या कोरोनामुळे त्यांच्या मनामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.आपला उदर निर्वाह व औषधांच्या खर्चाची व्यवस्था याद्वारे त्यांना करावी लागते माञ एकिकडे शासनाने सदर अनुदानाचा हप्ता तात्काळ पाठविला नाही तर आपण परत अनुदान मागणी तातडीने करावी जेणे करुन सदर लाभार्थींना आर्थिक व मानसिक ञास होणार नाही.अन्यथा सदर बाबतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतिने आक्रमक पविञा घेऊन आपल्या दालनात मुक्काम आंदोलन करणार असल्याचे तहसिलदार यांची भेट घेऊन सांगितले. व उद्भवणाऱ्या परीणामास सदर प्रशासन जबाबदार असेल यावेळी स्वाभिमानी चे जिल्हाउपाध्यक्ष अनिल बोरकर,तालुका अध्यक्ष पक्ष नितीन अग्रवाल, अफोरोज भाई,देवाभाऊ आखाडे,सह पदाधिकारी कार्यकर्त्ते उपस्थित होते.