रस्त्यावर चिखलचं चिखल नागरिक त्रस्त!

 

नासिर शहा
प्रतिनिधी

पिपंळखुटा ते आडगाव रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून चिखल साचला आहे.ग्रामस्थांना चिखल तुडक्त आपल्या गावात जावे लागत असल्याने चित्र आहे.या कडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
अडगांवची लोकसंख्या साठेचारशे असून,हे गाव राहेर (अडगांव) या गट ग्रामपंचायतमध्ये येते.गावामध्ये जाण्यासाठी साधा रस्तासुद्धा नाही.पिपंळखुटा या गावावरून दोन की.मी.चिखल तुडक्त या गावी जावे लागते.एखाद्या वेळी आजारी व्यक्तीला रुग्णालयात न्यायचे काम पडल्यास दोन कि.मी.च्या खराब रस्त्यामुळे १८ कि.मी.च्या फेऱ्याने न्यावे लागते.यामध्ये एखादी अप्रिय घटनासुद्धा घडू शकते.या गावात शिक्षणाची सोय नाही. आरोग्य सुविधा उपलब्ध नाही. अशा विविध समस्येने गाव ग्रासलेले आहे.नुकत्यास झालेल्या ग्रामसभेमध्ये या गट ग्रामपंचायत राहेर (अडगांव) गावाने २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होतो.तरी सुद्धा पिपंळखुटा रस्त्याचे काम सुरु केले नाही.राहेर अडगांवासायांना कुठे तालुक्याच्या ठिकाणी जायाचे म्हटले तर सदर रस्त्यावरील चिखल तुडवत जावे लागते .तसेच येथील २० ते २५ विद्यार्थ्यांना दररोज या असुविधेचा त्रास सहन करावा लागत आहे.पिपंळखुटा ते अडगांव हा दोन कि.मी.रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून मंजूर झाला होता.याचे ७५ टक्के कामसुद्धा झालेले आहे.परंतु काही काम हे तांत्रिक बाबी मध्ये अडकल्यामुळे हे काम अर्धवट राहिले आहे व अर्धवट राहिलेले रस्त्याचे काम राहेर अडगाववासीयांना मरणयातना देणारे ठरत आहे.तरी शाशसाने संबधित विभागाला या बाबिकडे गांभिर्याने लक्ष देण्याच्या सूचना द्याव्या राहेर अडगांव व पिंपळ खुटा वासीयांची या त्रासापासून सुटका करावी अशी ग्रामवासीयांची अपेक्षा आहे
सदर रस्त्यामुळे आजारी व्यक्ती व विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.तरी शाशसाने हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा
ही मागणी तिन्ही गावच्या नागरी कान कडून होत आहे

Leave a Comment