Andolannews/ अन्नत्याग आंदोलनाचा चेंडू आता जिल्हाधिकारी यांच्या दालनात ७ मे रोजी जिल्हाधिकारी सोबत शेतकरी मंडळाच्या बैठकीचे आयोजन

0
10

 

अकोला मूर्तिजापूर विलास सावळे

१ मे रोजी रखरखत्या उन्हात राष्ट्रीय महामार्गावर होणारे शेतकरी आंदोलन प्रशासनाने केलेल्या विनंतीवरून ८ मे पर्यंत पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ वानखडे व भारतीय किसान संघाचे राहुल राठी , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कैलास साबळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या सहमतीने दिली.
कुरूम, हातगाव, निंबा, जामठी या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मदतीतून वगळण्यात आले आहे.

सोबतच पिक विमा आजपर्यंतही मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून अतिवृष्टीची मदत, पिक विमा ,त्वरित मिळावा याकरता पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांना वेळोवेळी निवेदन देऊन मदतीसाठी प्रयत्न करण्याची विनंती करण्यात आली होती. यावर अनेक दिवस लोटूनही शेतकऱ्यांना आजपर्यंत मदत जाहीर केल्या गेली नसल्यामुळे लोकशाहीने दिलेल्या अस्त्राचा उपयोग करून शेतकऱ्यांनी १ मे रोजी अन्न त्याग आंदोलनाची हाक दिली होती.

Yavalnews / यावल येथे सेवा हक्क दिनानिमित्त बिबटया हल्ल्यात मरण पावलेल्या बालकांच्या कुटुंबीयांना आमदारांच्या हस्ते पन्नास लाखाची

आंदोलनाची धग लक्षात घेता तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी मंडळांची सभा आज आयोजित केली होती. यावेळी वेगवेगळ्या गावातील ६० शेतकरी प्रतिनिधी हजर होते. या सभेमध्ये पिक विमा, पिकाचे टाकण्यात येत असलेले प्लॉट,पीक पाहणी व कापणी अहवाल त्याची माहिती शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध करणे, न मिळालेली अतिवृष्टीची मदत, यावर सांगोपसांग चर्चा होवून यावेळी अनेक शेतकऱ्यांनी प्रश्नांची मांडणी केली.

शेतकऱ्यांना मदत व्हावी याकरता पीक कापणी अहवाल संबंधीची जून मध्ये कार्य शाळा आयोजन, पीक विम्याचे प्रश्न सोडवण्यासाठी दरमहा सभा, आदि निर्णय घेऊन यावर जातीने लक्ष ठेवण्याचे आश्वासन संदीप अपार यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले.या त्यांच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना प्रश्न सोडवण्यासाठी हक्काचे दालन उपलब्ध होणार आहे.

येत्या ७ मे रोजी अकोला येथील जिल्हाधिकारी यांच्या समवेत होणाऱ्या चर्चेतून सकारात्मक निर्णय न झाल्यास ८ मे पासून राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याचा निर्धार राजू वानखडे, राहुल राठी , कैलास साबळे व उपस्थित शेतकरी प्रतिनिधींनी जाहीर केला.

Andolannews :या वेळी सुभाष मोरे, छोटू पाटील बोंडे, प्रफुल्ल मालधूरे नंदकिशोर बबानिया, डॉ. संजय उमाळे, पंकज वानखडे, आनंद बांगड, विकी तिवारी,अजय गोरले, प्रीतम देशमुख, अक्षय देशमुख, गणेश भोसले, कमल किशोर जयस्वाल, पुरुषोत्तम धवक, अरुण गावंडे, ज्ञानेश्वर मोरे, प्रदीप भोयर, संदीप मोरे, अनिल राठोड,अरुण बोंडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here