Shegaonnews / विश्व हिंदू परिषद बजरंग दल सर्वपक्षीय नेते हिंदुत्ववादी संघटना व सकल हिंदू समाज यांच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले

0
41

 

इस्माईल शेख शेगाव /बुलडाणा

Shegaonnews:दिनांक 25 एप्रिल रोजी स्थानिक तहसील कार्यालय येथे काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हिंदू पर्यटकांच्या हत्या व त्याला पाठबळ असणाऱ्या पाकिस्तान याच्या विरोधात विश्व हिंदू परिषद बजरंग दल शेगाव शहर यांच्या नेतृत्वात निदर्शने व मृत पावलेल्यांना निरपराध हिंदू बांधवांना श्रद्धांजली व तहसीलदार यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले,

आणि कट्टर इस्लामिक मानसिकता असणाऱ्या जिहादी पाक पुरस्कृत दहशतवादी संघटना यांच्यावर कठोर कारवाई करून केंद्र सरकारने न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली ,आज त्या घटनेवर संपूर्ण देशामध्ये रोष आहे व हा हल्ला देशाच्या एकात्मता आणि अखंडतेवर हल्ला आहे.

Brekingnews /आर्णी येथे अभिलेखागार विभागात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार अधिकारी करतात दुर्लक्ष !

या घटनेचा सर्वांनी सर्व मतभेदांच्या पलीकडे जाऊन निषेध केला पाहिजे ,व सरकारने आपली जबाबदारी समजून यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी या माध्यमातून करण्यात आली.

यावेळी नगर संघ चालक श्याम सुंदर तेल्हारकर ,विश्व हिंदू परिषद शहराध्यक्ष मनीष नारनोलिया, प्रखंड उपाध्यक्ष सुनील जंजाळ प्रखंड मंत्री सोमेश कांबळे, नगर संयोजक अतुल ठोंबरे, नगर सहसंयोजक अभिषेक कनोजे, नगर मंत्री अक्षय जोशी , सुरज हिवराळे, हरिओम तिव्हाने , सिद्धेश्वर डिवरे, माजी नगराध्यक्ष शरद शेठ अग्रवाल ,भाजप शहराध्यक्ष ज्ञानेश्वर आप्पा साखरे, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन ढमाळ,

Shegaonnews:राजेश अग्रवाल ,जयेश गाडोदिया सतीश मुरारका, पवन धनुका, विजय राठी, सुनील भरतीया, पवन महाराज शर्मा, मुकिंदा खेडकर, दीपक शर्मा, आशिष पांडे , अशोक चांडक ,राजेंद्र ढोले, प्रकाश गोयंका ,शुभम भुसारी, डॉक्टर मोहन बानोले, अरुण चांडक, नंदू पाटील, दीपक ढमाळ, प्रकाश रावलानी, भरत पालडीवाल, अंजली जोशी ,प्रीती तिवारी, किरण शर्मा ,चेतना खेते ,संगीता आखरे, यासह असंख्य हिंदुत्ववादी संघटना व कार्यकर्ते उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here