इस्माईल शेख / शेगांव / बुलडाणा
Prashantdikkar:शेतकरी नेते प्रशांत डिक्कर यांच्यावर जिगाव प्रकल्पातील काही ठेकेदारांनी व अधिकाऱ्यांनी केलेल्या कट कारस्थानातून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर फिर्यादीने पोलीस स्टेशनच्या आवारातच दिलेल्या मुलाखतीमध्ये पैसे दिले नसल्याचे कबूल केले होते. त्यावरून सदरचे गुन्हे हे शेतकरी नेत्याला खोटा गुन्हा दाखल करून बदनाम करण्यासाठी दाखल केला असल्याची चर्चा होती.
Murdernews / नागपूरमध्ये वादविवादानंतर निर्घृण हत्या; एका पित्याची भावनिक कहाणी
सदर प्रकरणात आज शेगाव येथील न्याय दंडाधिकारी न्यायालय यांच्या समोर ॲड. वीरेंद्र झाडोकार यांनी जोरदार युक्तिवाद करून संपूर्ण प्रकरण मा. न्यायालयाच्या निदर्शनास खंडणीच्या गुन्हेबाबात लावलेली कलमे या प्रकरणामध्ये लागू होत नसल्याचे मा. न्यायालयाच्या निदर्शनास ॲड. विरेंद्र झाडोकार साहेब यानी जामिनावर अर्जावर युक्तिवाद करताना आणुन दिले. तसेच सदरचे गुन्हे हे राजकीय दबावाखाली दाखल केलेले आहेत ही बाब सुद्धा मा. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.
त्यावरून मा. न्याय दंडाधिकारी प्रथमश्रेणी न्यायालय शेगाव यांनी आज प्रशांत डिक्कर यांच्या जामीनावर आदेश पारित करून त्यांना जामीनावर मुक्त करण्याचा आदेश दिला. तसेच सदर आदेशामध्ये खंडणीची कलमे ही या प्रकरणात लागू होत नाही असं निरीक्षण सुद्धा नोंदवलेल आहे.
Prashantdikkar :त्यामुळे भविष्यात या प्रकरणाला निश्चितच वेगळं वळण मिळेल अशी चर्चा होत आहे. असे सदरचे गुन्हे हे खारीज करण्याकरता मा. उच्च न्यायालय याचिका सुद्धा दाखल करण्यात येणार आहे.