Brekingnews:देऊळगाव मही : राष्ट्रीय महामार्गांवरील चिखली- जालना रोडवर संदीप किराणासह अन्य तीन दुकानाला आज दि. 23 मार्च रोजी रविवारला सकाळी 6:00 वाजता इलेक्ट्रिक शॉटसर्किटमुळे अचानक लागलेल्या भीषण आगीत लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.
या आगीच्या घटनेमुळे स्थानिक नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. या घटनेचे सविस्तर वृत्त असे की,श्री शिवाजी विद्यालया समोर विजय श्रीराम शिंगणे यांच्या मालकीचे संदीप होलसेल व चिल्लर विक्रीचे किराणा दुकान आहे तर संजय प-हाड यांचे फायबर फर्निचर दरवाजे विक्रीचे दुकान तसेंच शेख.नसीम यांचे सायकल स्टोअर व सुनिल शिंगणे यांचे गोळ्या बिस्कीट अंडे पाणी होलसेल विक्रीचे दुकान आहे.
Brekingnews / बुलढाणा येथे ऑक्सीजन सिलेंडर स्फोटामुळे एक जण ठार, दोघे जखमी
संदीप किराणा दुकानासह अन्य तीन दुकानें जवळ जवळ असल्यामुळे कुठल्यातरी एका दुकानात शॉट सर्किट झाले. या शॉटसर्किटमुळे हळू हळू आगीने पेट घेतलेल्या आगीचे भीषण आगीत रूपांतर होऊन काही क्षणातचं होत्याचे नव्हते झाले.
चारही दुकानातील किराणा माल,नव्या जुन्या सायकल,टायर,ट्यूब मोटार सायकल टायर ट्यूब रिंगा फर्निचर दरवाजे, गोळ्या बिस्कीट पाणी बॉटल यासह अनेक साहित्य जळून खाक झाले आहे.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
याप्रसंगी आग विझाविण्यासाठी पाण्याच्या टँकरने गावातील नागरिकांनी मोठ्या धाडनाने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन गाडीला देखील पाचरण करण्यात आले होते. यावेळी महसूल विभागाचे तलाठी संदीप वायाळ यांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून प्राथमिक पंचनाम्यात अंदाजे 35 ते 40 लाखांचे नुकसान झाल्याचे समजते.
आगीच्या घटनेमुळे संदीप किराणा मालकाची प्रकृती खराब
Brekingnews:अचानक लागलेल्या आगीमुळे किराणा दुकानातील किराणा माल व साहित्य पूर्णपणे आगीत जळून खाक झाल्याचे पाहून विजय श्रीराम शिंगणे वय 45 यांना चांगलाच धक्का बसला असून त्यांना छातीमध्ये तीव्र अशा वेदना जाणू लागल्या होत्या.त्यांच्यावर प्राथमिक देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी जालना हलविण्याचे सांगितले.