सूर्या मराठी न्यूज ब्युरो
Shiv Bhojan Thali:खामगाव शहरातील उपजिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात शिवभोजन केंद्रामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकिस झाला आहे.
या केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या शिवभोजन थाळीमध्ये अळ्या आढळल्याचा किळसवाणा व्हिडिओ समोर आला आहे.
हे शिवभोजन केंद्र गरजू व्यक्तींना माफक दरात चांगले भोजन मिळावे म्हणून सुरु करण्यात आले होते. मात्र, येथील जेवणातील दर्जा निकृष्ट असल्याचे उघड झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
शिवभोजन थाळी म्हणजे फक्त दहा रुपयात पोटभरून जेवण मिळवण्याची संधी देणारी योजना. मात्र, या योजनेतील जेवणात मृत अळ्या असल्याचा प्रकार समोर आल्याने प्रशासनावर कारवाईची मागणी होत आहे.
Shiv Bhojan Thali / अन्न व औषध प्रशासनाकडून या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. हा प्रकार उघड झाल्याने शिवभोजन केंद्राच्या मोहिमेवर शंका उपस्थित झाली आहे.