प्रतिनिधी सचिन वाघे
policenews:वडणेर :- दि 14/03/25 रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पथक होळी सणानिमित्त अवैध धंद्यावर कारवाईची मोहिम राबवून पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे पो.स्टे. वडणेर हद्दीतील घाटसावली येथील राष्ट्रीय महामार्ग क्र 44 लगत असलेल्या मनीषा जैस्वाल हीचे मालकिचे निर्मल साई ढाबामध्ये दारूबंदीबाबत प्रो.रेड केला असता, ढाब्याचे आतील रूममध्ये व बाथरूममध्ये तसेच ढाब्यासमोर उभ्या असलेल्या कारचे डिक्कीमध्ये सिलबंद खरर्ड्याचे खोक्यात व प्लास्टीक चुंगडीमध्ये मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूचा साठा मिळुन आला असुन,
सदर दारूचा माल हा आरोपी नामे मनिषा जैस्वाल हिचे मालकिचा असुन, आरोपी नामे निमेष बिडकर हा तिचेकडे महिणा पगारावर दारूविक्रीचे काम करीत असुन, ते दोघेही त्यांचे स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता संगणमताने चोरट्या पध्दतीने अवैधरित्या दारूविक्रीचा व्यवसाय करीत असुन,
बच्चू कडूंची अनोखी धुळवड: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ५ किमी रस्ता रंगवला(Maharashtra Political )
सदर दारूचा माल हा आरोपी नामे आशिष कांबळे व मनोज चाफले यांनी त्यांचे कारनी आणुन दिल्याचे निष्पन्न झाल्याने, जागीचं मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून, आरोपी मनीषा जैस्वाल व निमेश बिडकर यांचे ताब्यातुन
1) 12 खरर्ड्याचे खोक्यात व 01 प्लास्टीक चुंगडीमध्ये देशी दारूने भरलेल्या गोवा नं. 01 कंपनीच्या प्रत्येकी 180 एम.एल. च्या 624 सिलबंद शिशा, कि 93,600 रू 2) 02 प्लास्टीक चुंगडीमध्ये विदेशी दारूने भरलेल्या रॉयल स्टॅग कंपनीचे प्रत्येकी 750 एम.एल. चे 16 सिलबंद बंम्फर कि 24,000 रू 3) दारू मालाची साठवणुक करण्याकरीता वापरलेली एक पांढ-या रंगाची Hyundai VENUE कंपनीची कार क्र. MH-32/AS-8552 कि. 10,00,000 रू असा जु.कि. 11,17,600 रू चा मुद्देमाल. जप्त करण्यात आला.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
असुन, 1) मनिषा संजय जैस्वाल, वय 46 वर्ष, रा. घाटसावली, तह. हिंगणघाट, जि. वर्धा, 2) निमेष माणिक बिडकर, वय 38 वर्ष, रा. घाटसावली, तह. हिंगणघाट, जि. वर्धा, 3) आशिष ईश्वर कांबळे, रा. वडणेर, तह. हिंगणघाट 4) मनोज बबनराव चाफले, रा. बांबर्डा, तह. हिंगणघाट याचेविरूध्द पोलीस स्टेशन वडणेर येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
policenews:सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अनुराग जैन सा., अपर पोलीस अधिक्षक डॉ सागर कवडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी सा. यांचे निर्देशाप्रमाणे, पो.अं. मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, रवि पुरोहित, विनोद कापसे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व खुशबु गोडघाटे (पो.स्टे. वडणेर) यांनी केली.