डोणगाव येथे गुरुवारी श्री खंडेराव महाराजांची यात्रा(Yavalnews )

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

Yavalnews:उंटावद ता. यावल डोणगाव येथे सालाबादाप्रमाणे यावर्षीही श्री खंडेराव महाराज देवस्थानाची यात्रा गुरुवार दि.१३ रोजी होणार असून दोन दिवसीय या यात्रोत्सवाचे हे ३ रे वर्ष आहे दरवर्षी ही यात्रा होळी या सनाच्या दिवशी येते.

श्री खंडेराव महाराज हे डोणगाव वासीयांचे ग्रामदैवत असून या यात्रोत्सवाचा ग्रामस्थांना मोठा उत्साह असतो
येथे श्री खंडेराव महाराजांचे भव्य मंदीर उभारण्यात आले असून यात्रेनिमित्त या मंदिरावर विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील महिला वाहकाच्या विनयभंगाची धक्कादायक घटना; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कारवाई नाही(Buldhana Crime News)

तर यावषी यात्रेनिमित्त गोंधळ सम्राट सचिनभाऊ व दिनेशभाऊ बेटावदकर यांचा जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आहे.

Yavalnews:या यात्रा उत्सवा दरम्यान आई एकविरा गृप,गुरु मित्र मंडळ,शिवराजे मित्र मंडळ, छत्रपती शासन गृप, सम्राट गृप,सर्व महिला बचत गट,स्वप्नातील डोणगांव गृप,राॅयल फौजी श्री.योगेशभाऊ पाटील मित्र परीवार व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभणार आहे तरी परिसरातील नागरिकांनी या यात्रोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

Leave a Comment