आईच्या हातातून सात वर्षाच्या मुलाला ओढून नेत बिबट्याने केले ठार किनगाव-साकळी शेत शिवारातील घटना ( Brekingnews )

 

आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी उपस्थित केला प्रश्न विधानसभेत

यावल(प्रतिनिधी )विकी वानखेडे

Brekingnews:शेतमजुरीसाठी शेताच्या बांधावरून जाणाऱ्या एका मजुरमहिलेच्या सात वर्षाच्या मुलावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने गंभीर पणे हल्ला करीत आईचा हातातुन हिसकावत त्या मुलाला शेतात बऱ्याच अंतरावर फरपटत नेले.या हल्ल्यात या मुलगा ठार झाला असून सदरची दुर्दैवी घटना दि.६ रोजी दुपारच्या वेळी साकळी शिवारातील मानकी नदीजवळ एका शेतात घडली आहे.

आपल्या पोटच्या मुलाला आपल्या हातातून एखादी हिंस्र प्राणी ओढून नेत त्याच्यावर हल्ला करीत असताना या अतिशय हृदयद्रावक घटनेत त्या मुलाच्या मातेने मुलाला वाचवण्यासाठी खूप जीवाचा आटापिटा केला मात्र नियतीपुढे ती हतबल झाली.व आपला पोटचा मुलगा हिरावला गेला. सदर घटनेने परिसरातील शेतशिवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.या अगोदरही शिरसाड शिवारात काही दिवसा अगोदर बिबट्याने बकरीच्या पिलावर हल्ला केल्याची घटना घडली होती.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काळीज पिळवटून टाकणारे व्हिडीओ समोर (santoshdeshmukhcase)

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की,किनगाव येथील शेतकरी केतन सुरेश चौधरी यांच्या साकळी शिवारातील मानकी नदीजवळील शेत गटनं ४७२मध्ये दि.६ रोजी मोलमजुरी करण्यासाठी चार ते पाच महिला गेलेल्या होत्या.त्यांच्यासोबत सात वर्षीय केशा प्रेमा बारेला हा एक लहान मुलगाही होता.दुपारच्या वेळी दीड ते दोन वाजेदरम्यान सदर शेताच्या बांधावरून जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने या सर्व महिलांवर अचानक हल्ला करून सोबतच्या लहान मुलाला आईच्या हातातून हिसकावले व त्याला घेऊन पळाला.

त्या महिलांनी एकच आरडाओरडा केला व त्या आईसह महिलाही त्या बिबट्याच्या मागे पळाल्या. बिबट्याने त्या मुलावर जोरदार हल्ला करत फरफटत ओढून नेल्याने तो लहान मुलगा जागीच ठार झाला आहे. केशा प्रेमा बारेला (वय ७ वर्ष) रा.खंडवा ह.मु.किनगाव असे या ठार झालेल्या मुलाचे नाव असून तो आदिवासी समाजातील आहे.त्या बिबट्याने ज्या ठिकाणावरून मुलाला आईच्या हातातून हिसकावले होते त्या ठिकाणापासून जवळपास शंभर फुटाच्या अंतरावर त्या मुलाला मारून सोडून दिले होते.

बिबट्याने त्या मुलाच्या डोक्यावर तसेच मानेवर,गळ्याजवळ तसेच छातीच्या भागाजवळ गंभीरपणे जखमा केलेल्या होत्या.या घटनेची माहिती कळताच किनगाव सह परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळाकडे एकच धाव घेतली.काही नागरिकांनी संबंधित वनविभागाला व वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करून या दुर्दैवी घटनेची माहिती कळवली.

 

आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी उपस्थित केला विधानसभेत प्रश्न

स दर घटनेची माहिती चोपडा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांना ही माहिती समजतात घटनेबाबत कुटुंबाच्या मदतीसाठी तसेच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी विधानभवनामध्ये सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेश ना मध्ये हा प्रश्न त्यांनीअर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उपस्थित केला

घटना स्थळी अधिकारी वर्गाची धाव

घटनास्थळी यावलच्या तहसीलदार
मोहनमाला नाझीकर,पोलिस प्रदीप ठाकूर,माजी आमदार रमेशदादा चौधरी, सह परिसरातील शेतकरी जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख सहाय्यक उपवनसंरक्षक प्रथमेश हडपे,यावल पश्चिमचे वन परिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे पूर्वचे सुनिल भिलावे यांनी भेट देऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली.घटनास्थळी पंचनामा करून मयत झालेल्या मुलाला यावल येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले व त्याच्यावर डॉ तुषार सोनवणे यांनी शवविच्छेदन केले.मयत मुलाचे आई-वडील हे आदिवासी समाजातील असून मोलमजुरीसाठी गावाकडे आलेले.मागील काही दिवसांपूर्वी शिरसाड-पिळोदा तसेच थोरगव्हण शेतशिवारातही बिबट्या दिसला असल्याची शेतकरी सांगत आहे.भीतीदायक वातावरणात रात्रंदिवस आपली शेतीची कामे करीत आहे.यादरम्यान शिरसाड शिवारात एका बकरीला हल्ला करून जखमी केलेले होते.याबाबत येथील नागरिकांनी वनविभागाकडे तक्रारही केलेली होती.संबंधित वनविभाग कार्यालयाने या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गरज आहे

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

वनविभागातर्फे आवाहन किनगाव साखळी शेत
शिवारातबिबट्याने लहान बालकावर जो हल्ला केला त्या पार्श्वभूमीवर शेतात एकट्या दुखट्याने जाऊ नये रात्रीच्या वेळी स्टार्च किंवा टेंभा घेऊन शेत शिवारात ये -जा करावीआणि अफवांवरअंकुश ठेवावा तसेच बिबट किंवा त्याचे ठसे आढळल्यास वनविभागाशी संपर्क साधावा खेड्यापाड्याच्या आजूबाजूलाच हिरवळ आहे थंडाव्यामुळे व पाण्यासाठी बिबट गावाजवळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही रात्रीचे वेळी शौचास ला जाताना टॉर्च किंवा ठेवा सोबत असू द्यावाअसे आवाहन वनविभागातर्फे सुनील भिलावे वनपरिक्षेत्राधिकारी पूर्व यांनी केले आहे

. वन विभागाकडून 25 लाखाची मदत मिळणार

Brekingnews:शेत शिवारात बिबट किंवा हिंस्र प्राणी यांनी मानवी हल्ला केल्यासत्याला वनविभागातर्फे आर्थिक मदत दिली जाते असा कायदा आहे त्यानुसार वन विभागाच्यावरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या मताच्या वारसांसाठी 25 लक्ष रुपये देण्यात येतील असे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीकडे माहिती दिली त्यातील दहा लक्ष रुपये येत्या दोन-तीन दिवसांमध्ये संबंधित कुटुंबांना देण्यात येणार आहे व उर्वरित पंधरा लक्ष रुपये शासनाचे नियम नुसार फिक्स मध्ये ठेवण्यात येतील असे सांगण्यात आले

Leave a Comment