संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काळीज पिळवटून टाकणारे व्हिडीओ समोर (santoshdeshmukhcase)

0
29

 

santoshdeshmukhcase:बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हिडीओ आणि फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे.

संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आली होती,

संतोष देशमुख हत्याकांड: मुलगी वैभवीची भावनिक प्रतिक्रिया, ‘माझ्या वडिलांची हत्या कुणाच्या वरदहस्ताखाली?'( Santoshdeshmukhmurdercase)

ज्यामध्ये त्यांना बळजबरीने ‘सुदर्शन घुले सर्वांचा बाप आहे’, असे म्हणायला लावण्यात आले. आरोपींनी त्यांच्या मोबाईलवर एकूण 15 व्हिडीओ आणि 8 फोटो काढले, ज्यात संतोष देशमुख यांची अमानुष मारहाण करण्यात आली होती.

या व्हिडिओंमध्ये त्यांचे कपडे काढताना आणि केस धरुन मारहाण करतानाचे चित्रण आहे. संतोष देशमुख यांनी “मला मारु नका” अशी विनवणी केली होती, मात्र आरोपींनी त्यांची मारहाण सुरू ठेवली.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील आरोपी महेश केदार याने व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली होती. या व्हिडिओंमध्ये तपकिरी आणि पांढऱ्या रंगाच्या पाईपच्या साहाय्याने मारहाण केल्याचे दिसून येते.

या प्रकरणातील आरोपींनी संतोष देशमुख यांच्यावर अत्यंत अमानुषपणे वार केले,

santoshdeshmukhcase: ज्यामुळे त्यांच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. हे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here