प्रतिनिधी सचिन वाघे
Sharadpawar:हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या गडचिरोली जिल्हा निरीक्षक पदी वर्धा जिल्ह्याचे खासदार अमर काळे,प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
आगामी होणाऱ्या निवडणुका तसेच गडचिरोली जिल्ह्यात पक्षाचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून खासदार अमर काळे,प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांची नियुक्ती करण्यात आली..
सदर नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
वर्धा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार अमर काळे,प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नियुक्तीने गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत होणार आहे.
Sharadpawar:तसेच लवकरच गडचिरोली जिल्हा दौरा सुद्धा करू असे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी सांगितले.गडचिरोली जिल्हा निरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल पक्षाचे विदर्भ प्रमुख अनिल देशमुख, वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, गडचिरोली जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, गडचिरोली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी अभिनंदन केले.