प्रतिनिधी सचिन वाघे
policenews:हिंगणघाट :– दिनांक 27 फेब्रुवारी ला मुखबीरकडून गुप्त माहिती मिळाली की,नंदोरी चौक येथील उडानपुलाखाली काही इसम पैशाचा हार जितचा जुगार खेळत आहे. अशा विश्वासनिय गुप्त माहितीवरून मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांनां माहिती देऊन .
प्रभारी ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात खबरे प्रमाणे नंदोरी चौक येथे पंच व पो स्टाफ सह रेड केला असता यातील आरोपी 1) आशिष विठ्ठल कारवाटकर वय 36 वर्ष राहणार विठ्ठल मंदिर वार्ड हिंगणघाट 2) आदेश भाऊराव इटणकर वय 21 वर्ष रा. माता मंदिर वार्ड हिंगणघाट 3) गजानन ज्ञानेश्वर गोल्हर
वय 40 वर्ष 4) गोविंद करमचंद सौदे वय 32 वर्ष राहणार शिवाजी वॉर्ड हिंगणघाट 5) राम बाबुराव कांबळे वय 24 वर्ष 6) मतीन मेहबूब शेख वय 32 वर्ष रा. वेळा ता. हिंगणघाट हे सगण मताने जुगार खेळताना मिळून आल्याने 1) बावन ताश पत्ते की. 100 /रू. 2)पत्त्याच्या डावावरील नगदी 1750 रू 3) आरोपीताच्या अंगझडतीत नगदी 5050 रू असा एकूण जु कीं 6900 /-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नंदोरी चौकात जुगार खेळण्याळ्यावर गुन्हे प्रगटीकरण पथकाची कार्यवाही (policenews)
असून पोलीस स्टेशन हिंगनघाट येथे आरोपीता विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे .ही संपूर्ण कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक अनुराग जैन , मा.अप्पर पोलीस अधीक्षक डॉ . सागर कुमार कवडे , मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत . यांचे निर्देशानुसार मा.मनोज गभने, पोलीस निरीक्षक .
policenews:हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरण पथकाचे अधिकारी पोउपनि भारत वर्मा , पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना. राहुल साठे, विवेक वाकडे, सुनील मेंढे,पो.शी मंगेश वाघमारे,आशिष नेवारे, विजय काळे यांनी केली. सदर गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.