राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे न.पा.मुख्याधिकारी यांना निवेदन…
प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट:-
sharadpawar:शहरातील डॉ. मुजुमदार वार्ड येथील दर्गाजवळील मुख्य रस्त्यावर पडलेला खड्डा तात्काळ बुजवण्यासाठी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे न.पा. मुख्याधिकारी यांना निवेदन दिले.
गुगल इंटर्नशिप: जगातील सर्वात मोठ्या टेक कंपनीत काम करण्याची संधी (Google Internship )
शहरातील डॉ. मुजुमदार वार्ड येथील दर्गा ते करंजी चौक कडे जाणार्या मुख्य रस्तावर मोठा खड्डा पडला आहे. दररोज या रस्त्यावर चारचाकी व दुचाकी वाहकाची वर्दन असते. तसेच या खड्ड्यामध्ये वाहनचालक पडून त्यांचा अपघात देखील झाला आहे. त्यात ते किरकोळ जखमी सुद्धा झाले आहे.
दिवसा वाहन चालक खड्डा वाचवून कसा बसा मार्ग काढतात पण मात्र रात्रीच्या वेळेस चालकांना खड्डा दिसत नाही व खड्ड्यात पडून त्यांचा अपघात होतो.
वरील विषयाला गांभीर्याने घेऊन या मुख्य रस्त्यावर पडलेला खड्डा तात्काळ बुजवून डॉ मुजुमदार वॉर्डातील नागरिकांना दिलासा द्यावा असे निवेदन राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हिंगणघाट शहर कार्याध्यक्षा सिमा तिवारी यांनी न.पा.मुख्याधिकारी यांना दिले आहे.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शहरातील डॉ.मुजुमदार वार्ड येथील दर्गाजवळील मुख्य रस्त्यावर पडलेला खड्डा तात्काळ बुजवा..(sharadpawar)
sharadpawar:यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे शहर कार्याध्यक्षा सिमा तिवारी, जिल्हा सरचिटणीस सुजाता जांभुलळकर, जिल्हा उपाध्यक्ष मिना सोनटक्के, ओबीसी शहर अध्यक्ष आचल वकील,शहर उपाध्यक्ष दिपाली रंगारी, अमित रंगारी, दिनेश भुते, सुरज मडावी, नयन पढरे,बेबी कुडमथे,कविता कोंबे,अब्दुल कलाम अजीज, समीर शेख, रझिया शेख, प्रेमनारायण तिवारी,नसीम शेख, रश्मी ठाकरे, मुकेश काशीनिवाल, शोभा तिवारी, शेख रज्जाक, जावेद पटेल आदी उपस्थित होते.