पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर शिवशाही बसमध्ये बलात्काराची धक्कादायक घटना पण.. (Pune rape)

 

Pune rape:पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास एका २६ वर्षाच्या तरुणीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५) याने तरुणीला दिशाभूल करून शिवशाही बसमध्ये नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

पीडित तरुणी फलटणला जाण्यासाठी बसस्थानकावर आली होती, तेव्हा आरोपीने तिला बसची दिशा चुकीची सांगितली आणि तिला शिवशाही बसमध्ये नेले. बसमध्ये अंधार असल्याचे तिने म्हणताच, त्याने तिला आत जाण्यास सांगितले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

पीडित तरुणीने घटनेनंतर फलटणच्या बसमधून निघून गेली आणि प्रवासात अस्वस्थ वाटत असताना तिने मित्राला फोन करून घटनेची माहिती दिली.

पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर शिवशाही बसमध्ये बलात्काराची धक्कादायक घटना पण.. (Pune rape)

त्यानंतर ती माघारी फिरून स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून त्याचा शोध घेण्यासाठी आठ पथके तैनात केली आहेत. आरोपी पूर्वी जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या घटनेने पुण्यातील सुरक्षेची चिंता निर्माण झाली आहे. स्वारगेट बस स्थानकावर १८ सीसीटीव्ही आणि जवळच पोलिस चौकी असतानाही ही घटना घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Pune rape:या प्रकरणात राज्यातील राजकीय नेत्यांनी आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे म्हटले आहे

Leave a Comment