अमिन शेख शेगाव तालुका प्रतिनीघी
Ravikanttupkar:कोल्हापूर, 15\12\2024 रोजी रविकांत तुपकर शेतकरी संघटने चे दबंग नेते कोल्हापूर-सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना आज जयसिंगपूर (ता. शिरोळ जि. कोल्हापूर) येथे चळवळीतील जेष्ठ सहकारी श्री. सावकारअण्णा मादनाईक यांच्या निवासस्थानी रविकांत तुपकर यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी शिरोळ तालुक्यातील चळवळीतील लढवय्या शिलेदारांशी मनमोकळा संवाद झाला. आगामी काळात एकत्रित येवून चळवळीचा झेंडा कसा पुढे नेता येईल.
व चळवळीची आगामी दिशा कशी असावी, यासंदर्भात विचार-विनिमय करून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या सर्व सहकाऱ्यांना भेटून खूप आनंद झाला.
Ravikanttupkar:यावेळी श्री. मिलिंदभाऊ साखरपे, श्री.शैलेशजी आडके, श्री.सागर मादनाईक, श्री.सतीश हेग्गान्ना, शिलकुमार चौगुले, पंकज मगदुम, ऋतुराज सावंत-देसाई, संदीपकुमार बेडगे, सुनील कामान्ना, बंडेश साखळे, प्रदीप पाटील, श्रुतिक पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.