तहसीलदार यांनी केलेल्या पडताळणी प्रकरण उघड
प्रतिनिधी सय्यद जहीर
crimenews:अवैद्य रेती वाहतूक प्रकरणातील शासकीय चलनात खाडाखोड केल्याचे निर्दशनास आल्या प्रकरणी निवासी नायब तहसीलदार रामप्रसाद डोळे यांच्या तक्रारीवरुन लोणार पोलिसांत ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी परिसरात साठवणूक केलेल्या रेतीची लोणार मार्गे अवैध वाहतूक केल्याचे मागील दिवसांमध्ये उघडकीस आले होते. याप्रकरणी अवैद्य रेती वाहतुकीवर महसूल प्रशासनाने कारवाई करत दंड आकारून दंडाची रक्कम वसूल केली. एप्रिल ते ३० नोव्हेंबर याकालावधीत अवैद्यरीत्या रेती वाहतूक कारवाई प्रकरणाची तपासणी करण्यात आली.
शरदचंद्र पवार साहेब यांचे विचार प्रेरणादायी….. संगितराव भोंगळ(Sharadpawar)
यामध्ये, अवैद्य रेती वाहतूक प्रकरणात आकारलेल्या दंडाची रक्कम भरलेल्या शासकीय चलनात खोडाखाड झल्याचे निर्दशनास आले. निवासी नायब तहसिलदार रामप्रसाद डोळे यांनी ११ डिसेंबर रोजी लोणार पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली.
त्यावरुन, विनोद डोईफोडे, गणेश हरिभाऊ चाटे, रामेश्वर वामन राठोड, अभिषेक जनार्धन कुंबफळे (सर्व रा. मंठा) व लोणार तालुक्यातील अरुण विष्णुपंत जायभाये यांच्या विरूध्द भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३३८, ३३६ (३), ३४० (२), ३ (५) नुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनात स.पो.उपनि. इंगळे हे करीत आहेत.
संबंधीत प्रकरणाचा तपास पोलिस करीत आहेत. तसेच वर्षभरात अवैद्य रेती वाहतूक कारवाई प्रकरण दंडाच्या भरणा झालेल्या चलनाची पडताळणी करणे सुरू आहे. यामध्ये गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.
भूषण पाटील, तहसिलदार, लोणार.
crimenews:या मागे कोण सदर प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून स्वतंत्र समिती नेमून सखोल चौकशी करून लेखा परीक्षण केल्यास खूप मोठे रॅकेट उघडे पडू शकते. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून शासनाची फसवणूक करणारे यामागे कोण सूत्रधार आहे याचा सुद्धा तपास करणे तितकेच गरजेचे आहे.