प्रतिनिधी सचिन वाघे
crimenews:हिंगणघाट :- हिंगणघाट विधानसभेच्या निकालानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी काढलेल्या विजयी मिरवणुकीला अडथळा निर्माण करीत पत्थरबाजी करुन काही युवकांना जखमी केल्याची घटना काल शनिवारी रात्री नऊ वाजताचे दरम्यान शहरातील निशाणपुरा वार्ड येथे टिपू सुलतान चौकात घडली.
वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank)
जखमी युवकांमध्ये भाजपा कार्यकर्ता वैभव रमेश हिवंज(३३) याचेसह २ कार्यकर्ते गंभीर जखमी झाले तर विजयी मिरवणूक बघणारी एक महिलासुध्दा जखमी झाली असून तिच्या पायाला फ्रॅक्चर झाले असल्याची माहिती मिळाली.
दोन गटात मोठा वाद निर्माण झाल्यावर याची माहिती पोलिसांना देण्यात आली, पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून कारवाई करीत स्थिती नियंत्रणात आणली.
रात्री उशिरापर्यंत भाजपा कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यासमोर एकत्र येऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
याप्रकरणी पोलिसांनी ईमराण, शोयब उर्फ बुट्री, हाशीम, भुऱ्या, शाहरुख, वसीम,
४ युवकांना रात्रीच ताब्यात घेतले असून पोलिस पुढील कारवाई करीत आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा विजयी मिरवणूकिवर तसेच कार्यकर्त्यांवर झालेल्या घटनेची आ. कुणावार यांनी दखल घेऊन पोलिसांना दोषींवर योग्य कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
crimenews:या घटनेचे शहरात सर्वत्र पडसाद उमटले असून पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शहरात भेट दिली.