प्रतिनिधी सचिन वाघे
diwali:-हिंगणघाट: रोटरी क्लब हिंगणघाटने जाम येथील चावरा आश्रमात बौद्धिक अपंग व्यक्तींना समवेत घेऊन हर्षोल्लासात दिवाळी साजरी केली.
वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank)
या प्रसंगी क्लब अध्यक्ष जितेंद्र वर्मा, सचिव उदयशेंडे, संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक मुखी, प्रकल्प संचालक प्रा. माया मिहानी, धीरज मांडोत, माजी अध्यक्ष प्रा. अशोक बोंगिरवार, सुरेश चौधरी तसेच आश्रमाचे फादर प्रिन्स आणि सिस्टर जेस्मी उपस्थित होते. क्लब अध्यक्ष जितेंद्र वर्मा यांनी या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की रोटरीचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे “सेवा हीच सर्वोच्चता”; गरजूंच्या जीवनात आनंद आणि हसू आणणे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून बौद्धिक अपंग व्यक्तींना कुटुंबासारखा अनुभव देऊन त्यांना आनंदी करणे हे आमचे ध्येय होते. डॉ. अशोक मुखी यांनी सांगितले की रोटरी क्लब दरवर्षी अशा वंचित समुदायांमध्ये जाऊन दिवाळी साजरी करतो, ज्यामुळे त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होतो. प्रा. अशोक बोंगिरवार यांनी या व्यक्तींना सृजनशील कला शिकवण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे त्यांच्यातील सुप्त कौशल्ये बाहेर येतील आणि ते व्यस्त राहतील.
यानंतर दिवाळीचा आनंद पारंपरिक मिठाई आणि चिवडा वाटप करून साजरा करण्यात आला. रोटरी क्लबच्या सदस्यांनी त्यांच्यासोबत दिवे लावले आणि फुलझड्या उडविल्या. संपूर्ण कार्यक्रमात आनंद आणि प्रेमाचे वातावरण होते, ज्यातून सर्वांच्या जीवनात प्रकाश आणि प्रेम असावे, तसेच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू यावे असा संदेश मिळाला. त्यानंतर सचिव उदय शेंडे यांनी सर्वांचे आभार मानले.
Diwali :कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. माया मिहानी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुंडलिक बकाने, पंकज देशपांडे, उदय भोकरे, पितांबर चंदानी, मितेश जोशी, मंजुषा मुले, अर्चना झाल्टे, जितेश नांदुरकर, समीक्षा, साई चौधरी आणि इतर अनेक सदस्यांनी अथक प्रयत्न केले.