________
महायुती आणि स्थानिक आमदारांनी मतदार संघातील जनतेला मुंगेरीलाल चे हसीन स्वप्न दाखवले: राजे छत्रपती संभाजी महाराज
जळगाव(जामोद):११महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये केवळ घोषणांचा पाऊस पडलेला आहे. आता त्यांना कापूस, सोयाबीनचे हमीभाव दिसतात. निवडून आल्यावर कर्जमाफी देऊ म्हणतात. आतापर्यंत सरकार त्यांचेच होते.
कर्जमाफी पण सोडाच आतापर्यंत अतिवृष्टीचे पैसे नाहीत, पिक विम्याचे पैसे नाहीत, एक साधा प्रक्रिया उद्योग सुद्धा २० वर्षे आमदार राहिलेल्या व्यक्तीने ह्या मतदारसंघात आणला नाही. जळगाव जामोद, विधानसभेची लढत ही प्रस्तापिताविरुद्ध लढाई आहे.
छत्रपती शिवराय हे रयतेचे राजे होते, आम्ही सुद्धा रयते सोबतच आहे. प्रशांत सुद्धा रयतेचा राजा आहे.जनतेच्या मनातला आमदार आहे. आमचा महाराष्ट्र स्वराज पक्ष हा शेतकरी ,शेतमजूर, मागासवर्गीय, दिन दलित वंचितांचा पक्ष आहे. स्थानिक आमदार संजय कुटे हे रोज रोज नवीन थापा मारतात. जनतेची दिशाभूल करतात.
वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank)
महायुती आणि आमदार संजय कुटे यांनी ह्या परिसरातील जनतेला वीस वर्षात फक्त मुंगीरेलालचे हसीन स्वप्न दाखविले. आता कोणत्याही भूल थापांना बळी न पडता परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांना प्रचंड मतांनी विजयी करा व व परिवर्तन घडवा असे आवाहन परिवर्तन महाशक्ती चे संयोजक तथा महाराष्ट्र स्वराज पक्षाचे अध्यक्ष राजे छत्रपती संभाजी यांनी केले. ते दिनांक १० ऑक्टोबर रोजी स्थानिक बायपास वरील मैदानावर उमेदवार प्रशांत काशीराम डिक्कर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत हजारोंच्या जनसमुदायासमोर बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर उमेदवार प्रशांत डिक्कर, गजानन बंगाळे पाटील , धनंजय जाधव , उज्वल पाटील चोपडे, सम्मेद पाटील, सय्यद बाहोद्दीन, विठ्ठल वखारे, विलास बोडखे, वंदनाताई डिक्कर यांची सुद्धा उपस्थिती होती.
एका आदिवासीने आपले दीड गुंठा शेत आणि एका युवकाने चार ग्राम सोन्याची अंगठी उमेदवार प्रशांत यांना दिल्याने आपण स्वतः भाराऊन गेलो होतो. आता ही लढाई प्रशांत डिक्कर यांची नसून राजे छत्रपती संभाजी यांची आहे. प्रशांतला यापुढे खर्च करण्याची गरज नाही. त्याचा सर्व खर्च राजे छत्रपतींचा महाराष्ट्र स्वराज पक्ष करेल.
असेही यावेळी राजे छत्रपती यांनी सांगितले. छत्रपती शिवरायांनी जसा इतिहास घडवला तसाच इतिहास प्रशांत डिक्कर यांना निवडून आणून तुम्हाला घडवायचा आहे. प्रशांत ने शून्यातून विश्व निर्माण केले. तो निवडून येता बरोबर त्याला हेलिकॉप्टरने मुंबईला नेऊ असे आश्वासन सुद्धा यावेळी राजे छत्रपती संभाजी यांनी दिले.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकरी शेतमजुरांचा संघर्ष विधानसभेत पाठवा: प्रशांत डिक्कर सध्या महायुतीकडून मला व माझ्या कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास होत आहे. प्रशासनावर दबाव टाकून आमदार संजय कुटे यांनी आमच्या सभेला परवानगी नाकारली. सोनाळा, बावनबिर, पडसोळा परिसरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आमचे बॅनर फाडले. आपण स्वतः भूमीहीन असून एक गुंठा जमीन सुद्धा आपल्याकडे नाही. १६ वर्षापासून जनतेसाठी संघर्ष करत आहे.
माझी पत्नी दिवसभर टेलर काम करते. माझी आई दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते. माझ्याजवळ पैसा असता तर मी आईला दुसऱ्याच्या शेतात कामाला जाऊ दिले नसते. शेतकरी, शेतमजूर , कष्टकऱ्यांचां संघर्ष हा विधानसभेत पाठवा. अंगामध्ये रक्ताचा अखेरचा थेंब असेपर्यंत आपण जनतेची सेवा करत राहू असे आश्वासन यावेळी परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांनी जनतेसमोर दिले. महायुतीच्या उमेदवार स्वाती वाकेकर यांच्यावर सुद्धा डिक्कर यांनी टीका केली. महायुती म्हणते प्रशांत डिक्करला महाविकास आघाडीच्या स्वाती वाकेकर यांनी उभे केले.
vidhansabha:-तर महाविकास आघाडी वाले म्हणतात महायुतीच्या संजय कुटेंनी प्रशांत डिक्करला उभी केले. आई आणि दोन मुलांची शपथ घेऊन सांगतो, आपण कुणाच्या सांगण्याने उभे राहलो नाही. शरीरात अखेरचा रक्ताचा थेंब शिल्लक असेपर्यंत जनतेसाठी हा संघर्ष करत राहील, असे सुद्धा यावेळी प्रशांत डिक्कर यांनी कथन केले. राजेनी उमापुर येथिल आदीवासी वस्तीवर मुक्काम केल.