Vidhansabha:संग्रामपूर/स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा मा.खासदार राजु शेट्टी यांनी प्रशांत डिक्कर यांची जळगाव जा विधानसभा जागेवर महाराष्ट्रातुन पहिली उमेदवारी जाहिर करित हा मतदारसंघ काबीज करण्यासाठी चांगलीच प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
या संपूर्ण निवडणुकीचे नियोजन करण्यासाठी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष उज्वल पाटील चोपडे यांनी बुधवार दि.२३ ऑक्टोबर २०२४ रोजी आयटीआयच्या बाजुला रेणुका माता मंदिर जळगाव रोड संग्रामपूर येथे दुपारी १ वाजता कार्यकर्त्यांची निवडणुक नियोजन बैठकीचे आयोजन केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तुलनेत ईतर पक्षाकडे नेते मंडळींनी कार्यकर्ताच जिवंत ठेवला नसल्याने सध्याच्या घडीला मोजकेच नेते व ठेकेदार सोडले.
पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)
तर निवडणुकीच्या प्रचारासाठी मजुरीने माणसं लावायची की काय अशी परिस्थिती राजकीय पक्षात निर्माण झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष व परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांनी जळगाव मतदार संघातील शेतकरी,शेतमजूर,महिला बचत गट, विद्यार्थी,व बेरोजगार युवकांच्या प्रश्नावर १६ वर्षांपासून लढा देत असल्याने या लढ्याच्या माध्यमातून मतदारसंघात कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण झाली आहे.
सर्वच घटकांच्या हितासाठी केलेल्या आंदोलनाने कष्टकरी जणतेचा फायदा झाला असल्याने जनसामान्यांचा प्रशांत डिक्कर जीव की प्राण झाला आहे. प्रशांत डिक्कर यांचेसाठी काही पण अशा हजारो कार्यकर्त्यांनी जीव ओवाळून टाकला आहे.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
त्यामुळे गोर गरीब कष्टकरी जणतेचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी प्रशांत डिक्कर यांना विधानसभा सभागृहात पाठवण्यासाठी गावा गावात निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने केलेल्या तयारीचा आढावा व पुढील निवडणुकीचे नियोजन करण्यासाठी आयोजित केलेली बैठक अतिमहत्त्वाची आहे.
Vidhansabha :-या बैठकीला संघटनेचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, सरपंच-सदस्य,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवार दि.२३ ऑक्टोबर २०२४ रोजी संग्रामपूर येथे दुपारी १ वाजता आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष उज्वल पाटील चोपडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.