फनिष सामाजिक विकास संस्थे अंतर्गत चाळविण्यात येणाऱ्या रुग्णमित्र – फॉउंडेशनला पाच हजाराची आर्थिक मदत(Hingnghat)

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट येथील रुग्णसेवेत अग्रेसर असलेल्या फनिष सामाजिक संस्था अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या रुग्णमित्र – फॉउंडेशनला पती स्व. पांडुरंगजी विरुळकर स्मृती प्रित्यर्थ रुपये पाच हजार रुपयाचा धनादेश येथील सामाजिक कार्यकर्ता व जि. प. शाळेतील शिक्षिका श्रीमती राजश्री विरुळकर यांनी दि 14 ऑक्टोंबरला एका कार्यक्रमात या फाऊंडेशनचे संस्थापक रुग्णमित्र गजू कुबडे यांच्या स्वाधीन केला आहे.

रुग्णमित्र – फाउंडेशन हे मागील पाच वर्षा पासून शासकीय निमशासकीय योजनेतून रुग्णांनां मिळणारी मदत ही रुग्णालयांच्या नावाने येते व पैसा थेट त्या त्या रुग्णालयाच्या खात्यात जमा होतो.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

परंतु त्या व्यतरिक्त गरीब परिवारातील रुग्णाला बाहेरून औषधी वा अन्य कामासाठी लागणाऱ्या आवश्यक पैशाची व्यवस्था त्यांच्या जवळ राहत नसल्याने हे परिवार आर्थिक अडचणीत येतात. अशा वेळी सदर रुग्ण सोय नसल्याने कर्जबाजारी होतात.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

व एका नव्या संकटात सापडतात. अशा गरजू परिवारातील रुग्णाना त्याच्या आवश्यकते नुसार आर्थिक मदत रुग्णमित्र – फॉउंडेशन तर्फे करण्यात येते. आता पर्यंत या रुग्णमित्र – फॉउंडेशन तर्फे नऊ रुग्णाना मदतीच्या हात दिला दर महिन्याला लागणारा औषधीसाठी खर्च या रुग्णमित्र – फॉउंडेशनला मिळणाऱ्या देणगीतून करण्यात येतो.

Hingnghat:या साठी दानदाते व सेवाभावी संस्था यांच्या कडून आजवर मिळालेल्या उदार आर्थिक मदतीसाठी या सर्व अज्ञात दानदात्यांचे रुग्णमित्र- गजू कुबडे यांनी आभार मानले असून देणगीदात्यानी नेहमी प्रमाणे या फनिष सामाजिक विकास संस्थे अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या रुग्णमित्र फाउंडेशनच्या बँक अकाउंट नंबर वर दान देऊन आजपर्यत दिली तशीच साथ देऊन गोरगरीब रुग्णासाठी चेतविलेल्या ह्या यज्ञात आपली एक दानरुपी समिधा अर्पण करावी अशी विनंती रुग्णमित्र – फाउंडेशन तर्फे करण्यात आलेली आहे.
Fanish Samajik Vikas Sanstha Hinganghat
Bank Of Maharastra
Branch Hinganghat Dist. Wardha
Account No. 60223043910
IFSC Code. MAHB0000059

Leave a Comment