यावल प्रतिनिधी विकी वानखेडे
Yaval :तालुक्यातील श्री क्षेत्र साईबाबा मंदिरात 10 ऑक्टोबर गुरुवार रोजी म्हणजेच अश्विन शुद्ध सप्तमी या दिवशी श्री साईबाबा मंदिराचा महाप्रसाद संध्याकाळी आयोजित करण्यात आलेला असून समस्त भाविक भक्तांनी महाप्रसादासाठी उपस्थिती द्यावी असे आवाहन साईबाबा संस्थान अध्यक्ष हिरालाल व्यंकट चौधरी उपाध्यक्ष आणि ट्रस्टी या गावचे सरपंच उपसरपंच सर्व संचालक मंडळ तसेच विकास सोसायटी चेअरमन व संचालक मंडळ व ग्रामस्थ वनोली यांनी आवाहन केले आहे.
आश्विन शुद्ध सप्तमी ही गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर या दिवशी येते घटस्थापनेनुसार आठव्या दिवशी साईबाबा मंदिरात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो त्यानुसार यावर्षी 10 ऑक्टोबर गुरुवार 24 रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे भाविक भक्तांनी येथे महाप्रसादासाठी यावे व मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे
पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)
दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 11 ऑक्टोबर शुक्रवार रोजी साईबाबा देवस्थानची यात्रा संपन्न होणार आहे सव्वाशे फूट उंच देवकाठी धुण्यासाठी मोर नदीवर लिहिण्यात येते व तिथून या काठीचे स्नान करून तिला सजवून वाजत गाजत गावामध्ये येते व ग्रामस्थ एका हातात काठी घेऊन नाचतात याच दिवशी संध्याकाळी बारा गाड्यां ओढण्याचा कार्यक्रम होणार आहे तर रात्री लोकनाट्य तमाशा मंडळ करमणूक साठी ठेवण्यात येतात
श्री साईबाबा महाराज शिर्डी येथे जात असताना वनोली गावी या मंदिराच्या ठिकाणी थांबले होते त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या हस्ते शिवलिंगाची स्थापना केली होती म्हणूनच या मंदिराला साईबाबा महाराजांचे नाव देण्यात आले आहे.
या ठिकाणी भक्तगण मानता मानतात गोडेतेल नारळ या ठिकाणी मंदिरात अर्पण करीत असतात सुमारे साडेपाचशे वर्षांपूर्वी दुष्काळ पडला होता त्याकाळी या ठिकाणी साईबाबा महाराजांनी या ठिकाणी जे दोन दिवे आज तेलाने नेहमी जडत असतात ते पाण्यावर जाळले होते.
त्या दिवसापासून अखंड ज्योत या दिव्यांची सुरू असून या ठिकाणी तेल कधीही खुटत नाही दहा फूट खोल आणि दहा फूट रुंद अशी टाकी या ठिकाणी मंदिरात बांधण्यात आलेली असून त्यामध्ये भक्तगण तेल नवस म्हणून टाकत असतात त्यातूनच तेल दिव्यांमध्ये वापरले जाते व महाराजांचा जो महाप्रसाद केला जातो त्यावेळी लागणारे तेल इथूनच वापरले जाते सुमारे 40 ते 50 हजार भाविक दरवर्षी महाप्रसादाला हजेरी लावतात या महाप्रसादासाठी वनोली कोसगाव दुस खेडा म्हैसवाडी पाडळसा बामनोद विरोदा आमोदा रिधोरी मांगी करंजी वडोदा सावदा फैजपूर येथून भाविक महिला स्वयंपाकासाठी सुद्धा मदत करतात.
महाप्रसादात साखरेची खीर चपाती गंगा फडची भाजी आणि हरभऱ्याची शोले यांची भाजी संपूर्ण भाविकांना पुरेल एवढे उडदाच्या डाळीचे वडे स्वयंपाकात केले जातात या ठिकाणी भाविक गण साहित्य रूपाने सुद्धा देणगी आणून देतात परिसरातील सर्व तरुण वर्ग व स्थानिक ग्रामस्थ हिरीरीने कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत असतात
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गेल्या पंधरा वर्षाच्या कालखंडात माजी खासदार स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे या मंदिरासाठी खूप मोठे योगदान लाभलेले आहे शासनाकडून निधी आणून दिलेला होता तर आमदार एकनाथ खडसे केंद्रीय मंत्री नामदार रक्षाताई खडसे महाराष्ट्र राज्याचे मंत्री गणातील नामदार गिरीश भाऊ महाजन पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील स्थानिक आमदार शिरीष चौधरी यांनी सुद्धा या मंदिरासाठी अनुदान आणण्यासाठी सहकार्य केले.
Yaval :सदर कार्यक्रमात आरोग्य विभागातर्फे या ठिकाणी आरोग्याची काळजी घेण्यासाठी शिबिर लावण्यात येते तर फैजपूर पोलीस प्रशासनातर्फे कडक व चोक बंदोबस्त ठेवण्यात येतो