जाम येथे आमदार समिर कुणावार यांचा भव्य नागरी सत्कार(Hingnghat)

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat :हिंगणघाट :- हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील जाम व समुद्रपूर सर्कल चे वतीने आमदार समीर कुणावार यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाल्याबद्दल व जाम येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाल्याबद्दल काल दिनांक ०५-१०-२०२४ रोजी भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

यावेळी जाम चौकातून भव्य रॅली काढून आमदार समीर कुणावार यांचा अनेक गावातील नागरिकांनी, विविध सामाजिक संघटनांकडून सत्कार करण्यात आला.

यावेळी मंचावर अध्यक्ष स्थानी जाम च्या सरपंच लता कुडमथे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पार्टी चे उपाध्यक्ष किशोर दिघे,माजी जि प सदस्य शंकर कांबळे,माजी सरपंच मोरेश्वर सातपुते,अजयराव किटे, महादेव बैलमारे, अशोक मून,गोविंद सराटे, शेतकरी संघटनेचे शंकर घुमडे,सुभाष चंदनखेडे, व्यपारी अशोषियन चे रमेश

भोयर,हरिओम बाबा गौशाळा चे संचालक राजा मॅडमवार, जेष्ठ पत्रकार सुधीर खडसे,युवा मोर्चा चे प्रदेश सचिव अंकुश ठाकूर,ओबीसी मोर्चा चे रवी उपासे,संजय डेहणे,योगेश फुसे,गोविंद सराटे ,प्रभाकर घुमडे, देव खोब्रागडे ,तास च्या सरपंच वीणा झोटिंग, हिवरा सरपंच नलिनी थुटे ,रवी लढी,गजानन राऊत,सचिन गावंडे, मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन करून व दहेगाव चे सरपंच स्व. अंकुश खुरपडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

आमदार समिर कुणावार मार्गदर्शन करताना म्हणाले की महाराष्ट्रात ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा सरकारकडून करताच हे महाविद्यालय हिंगणघाट मध्ये कसे आणता येईल यासाठी सातत्याने संबंधी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना भेटून आदी ४०० बेडचे रुग्णालय हिंगणघाट येथे मंजूर करून घेतले आणि त्यांनतर आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने वर्धा जिल्हा मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे एका तालुक्याच्या ठिकाणी आणण्यात येशस्वी ठरलो.

आता लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जाम येथे होणार असून माझे धैर्य पुर्ण होणार यांचा मला आंनद आहे. जाम ,समुद्रपूर परिसरातील येवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून माझा सत्कार व सन्मान केला यामुळे माझे मन भरून आले आहे.यापुढेही मी जनतेची सेवा करीत राहणार आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी पांदण रस्त्याचे कामे हाती घेणार आहो असे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, रमेशभाऊ भोयर,शंकरराव कांबळे यांनी सुध्दा उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच सचिन गावंडे यांनी केले तर संचालन प्रा मेघश्याम ढाकरे यांनी केले.

Hingnghat :तर आभार गजानन राऊत यांनी केले यावेळी गावागावातुन आलेल्या लोकांनी आ. समिर कुणावार यांचा सत्कार केला सदर कार्यक्रमाला पाच हजाराचे वर जाम सर्कल व समुद्रपूर शहरातून नागरिक ,महिला उपस्थित होत्या
कार्यक्रमाचे यशस्वीते साठी जाम येथील सचिन गावंडे मित्र परिवार व शेषराव तुळणकर मित्र परिवार व सर्व स्तरातील युवकांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment