आखिव पत्रिकेचे वाटप करणे हा माझा आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण -: आमदार समीर कुणावार (Hingnghat)

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat :हिंगणघाट :- आमदार समीर कुणावार यांच्या अथक प्रयत्नाने महसूल विभाग तालुका प्रशासन हिंगणघाट व्दारे आयोजित महाराजस्व अभियानांतर्गत पट्टे वाटप,अखिल पत्रिका वाटप विविध लाभाचें वितरण कार्यक्रम स्थानिक निखाडे भवन येथे पार पडला.

राज्यातील कापुस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा निर्णय..(farmer)

या कार्यक्रमात मागील ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या संत गोमाजी महाराज वार्ड,संत कबीर वार्ड इंदिरा गांधी वार्ड येथील जागेच्या पट्ट्याच्या प्रश्न सातत्याने प्रयत्न करीत सोडविला होता आता त्याच जागेचा एकुण ७९६ लाभार्थ्यांना अखिव पत्रिका वाटप करण्यात आले.

यावेळी त्या लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून व मी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे पाहून अत्यंत आनंद झाल्याची भावना आमदार समीर कुणावार यांनी व्यक्त केली.

या अभियानातंर्गत विविध योजनेतील एकुण १०५१ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला त्यातप्रामुख्याने नगरपरिषद  विभागाच्या सर्वांसाठी घरे योजनेतंर्गत एकुण ११० पट्टे वाटप
भूमी अभिलेख विभागाच्या वतीने एकुण ७९६ आखिव पत्रिका वाटप

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कृषी विभाग वतीने शेतकऱ्यांना एकुण ५० स्प्रे पंप वाटप
पंचायत समिती हिंगणघाट वतीने सर्वांसाठी घरे योजनेतंर्गत एकुण १४ पट्टे वाटप, एकुण ३१सिंचन विहीर,१२ गुरांचा गोठा,०७ मोहगणी वृक्ष लागवड,३१ पशू संवर्धन विभाग योजनेतील लाभार्थी असून असे एकुण १०५१ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आल्याची माहिती आमदार कुणावार यांनी दिली यावेळी सर्व लाभार्थ्यांना आमदार कुणावार यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

Hingnghat :शेवटच्या लाभार्थ्यांना लाभाचे प्रमाणपत्र देत पर्यंत आमदार कुणावार स्वतः उपस्थित होते हे विशेष* या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी वंदना संवरपतगे, तहसीलदार योगेश शिंदे, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे,नायब तहसीलदार सागर कांबळे,भूमी अभिलेखचे तांबाडे , पांडुरंग तुळसकर,किरण वैद्य, नगरसेवक सोनू गवळी, नगरसेविका वंदना कामडी,पदमाकोडापे सर्व विभागांचे विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

Leave a Comment