प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी
हिंगणघाट तालुका संघाचा १४ गुणांनी पराभव
सिंदी रेल्वे ता.१: येथील विजय विद्यालयाच्या मुलींनी जिल्हास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेत १७ वर्ष वयोगटातील कबड्डीच्या चुरशीच्या सोमवारी (ता.३०) ला झालेल्या अंतीम सामन्यात हिंगणघाट तालुका संघाचा १४ गुनानी पराभव करीत शालेय विभागीय स्पर्धेसाठी आपल्या संघाची निवड निश्चित केली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे देशासाठी मोलाचे योगदान साहेबराव पाटोळे(Lonar)
……. कबड्डीचे माहेर घर म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या सिंदी रेल्वे शहराने कबड्डी या खेळात अनेक नामवंत खेळाडू दिले असुन आजही ही परंपरा कायम असुन आजही कबड्डी या खेळात सिंदी रेल्वे शहराचा दबदबा आहेत.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
विजय विद्यालयाच्या १७ वर्षीय विजयी संघाचे नेतृत्व अक्षरा रहाटे हिने करीत आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.शिवाय विजय विद्यालयाच्याच १४ वर्षीय मुलीच्या कबड्डी संघातील अक्षरा मेहरकुरे आणि तन्वी रहाटे या दोन खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
Hingnghat:सर्व यश प्राप्त खेळाडूनी आपल्या यशाचे श्रेय विजय विद्यालयाच्या प्राचार्य रेखा तडस(झिलपे),निलेश बहादे,अनिल डंभारे आदींना दिले असुन विद्यालयाच्या सर्व शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी विजयी चमुचे अभिनंदन केले आहे.