आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याचा बंधारा भूमिपूजन प्रसंगी आमदार समीर कुणावार यांचे भावनिक उदगार(Hingnghat)

 

प्रतिनिधी सचिन वाघे

आज नगरपालिका हिंगणघाट प्रांगणात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगोरात्थान महाअभियानांतर्गत हिंगणघाट पाणीपुरवठा योजनेकरीता वणा नदीवर ४७कोटी ३० लक्ष रूपये किंमतीचा बंधारा बांधकामांचे भूमिपूजन आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते तथा माजी नगराध्यक्ष प्रेमबाबू बंसतानी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यावेळी मनोगत व्यक्त करताना.

आमदार कुणावार यांनी बंधारा कश्या पद्धतीने मंजूर करून आणला याबाबत माहिती उपस्थितांना दिली हिंगणघाट येथील बंधारा मंजूर करून आणणे हि काय सोपी बाब नव्हती या बंधारासाठी सुमारे १५ वर्षा आधी ५ कोटी रुपये मंजूर झाले होते.

हिंगणघाट विधानसभेत तुतारी पर्वाची सुरुवात… वाजतेय तुतारी.. वाजणार तुतारी!(Hingnghat)

मात्र तत्कालीन नगरपरिषद नगर परिषद प्रशासनाच्या काळात बंधारा बांधकामांची गुणवत्ता कायम राखता न आल्याने तो बंधारा निकृष्ट दर्जाचा ठरला व वाहून गेला त्यामुळे एकाच कामांकरिता परत निधी प्राप्त करणे हि बाब अत्यंत कठीण होती परंतु आमदार कुणावार यांनी मागील दहा वर्षांपासून सातत्याने या बंधारासाठी निधी मिळावा.

म्हणून पाठपुरावा करत वेळोवेळी संसदीय आयुधांचा वापर करत शासनाला सदर बंधाऱ्याच्या कामाबाबत लक्ष वेधतं शासनाकडून निधी प्राप्त करून घेतला आज त्या कामांचे भूमिपूजन करताना अतिशय समाधान होत असून आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहण्यांचा असल्याचे भावनिक उदगार काढले ‌.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी  येथे क्लिक करा 

माझ्या हिंगणघाटकर जनतेला दिलेल्या शब्दांच्या पुर्तेते करीता एक पाऊल पुढे टाकले असून लवकरच सदर बंधाऱ्याचे बांधकाम पुर्ण झाल्यावर चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे स्वप्न पूर्णत्वास येणार असल्याची भावना व्यक्त केली.

Hingnghat :यावेळी माजी नगराध्यक्ष प्रेम बंसतानी,माजी न.प.उपाध्यक्ष चंदूभाऊ मावळे,किरण वैद्य, श्रीमती प्राजंली टोंगसे, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे माजी नगरसेवक नगरसेविका व शहरातील प्रतिष्ठित नागरिक नपा अधिकारी व कर्मचारी, पत्रकार बंधू उपस्थित होते

Leave a Comment