गिरड सर्कलच्या वतीने आमदार समिर कुणावार यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला(Hingnghat)

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:गिरड :- हिंगणघाट, समुद्रपूर, सिंधीरेल्वे विधानसभा क्षेत्रातील जनतेने मला दोन वेळा भरभरून मते देऊन विधानसभेत पाठविले आणि मी जनेचा सेवक म्हणून काम करीत तुमचे प्रश्न विधानसभेत मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले तुम्ही माझ्यावर दाखविलेल्या विश्वासामुळे आज मी आमदार आहे आणि तुमच्या मुळेच उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार प्राप्त झाला असून तो माजा नसुन मतदार संघातील जनतेचा आहे.

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

असे मत आमदार समिर कुणावार यांनी गिरड येथे आयोजित नागरी सत्कार समारंभाला मार्गदर्शन करताना व्यक्त केले.आमदार कुणावार यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच जाम येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाल्याबद्दल गिरड ग्रामपंचायतीच्या प्रांगणावर भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी गिरड येथील बस स्टॉप चौकातून ढोल ताश्याच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करीत रॅली काढण्यात आली यावेळी आमदार समिर कुणावार यांच्या हस्ते माऊली देवस्थान व छत्रपती शिवाजी महाराज व राम मंदिर येथे पुजा अर्चना करण्यात आली या रॅलीचा समारोप कार्यक्रमात स्थळी करण्यात आला.

त्यांनतर सत्कार सोहळ्याला सुरुवात करण्यात आली.यावेळी मंचकावर गिरडचे सरपंच राजु नौकरकर,भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकूर, तालुकाध्यक्ष वामनराव चंदनखेडे, सरपंच विलास नवघरे,अरूण मोटघरे, बहादुर सिंह अकाली,माजी उपसरपंच नुतन गिरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य फकीराजी खडसे, सामाजिक कार्यकर्ते अतुल काळपांडे,अब्दुल कदिर,प्रल्हाद पोयाम, सुभाष नन्नावरे , योगेश झिंगरे, दमडू मडावीआदी मान्यवर उपस्थित होते.आमदार कुणावार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी गिरड ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच राजु नौकरकर सह ग्रामपंचायत सदस्यायांनी आमदार समिर कुणावार यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला.तर सामाजिक कार्यकर्ते अतुल काळपांडे यांनी सुध्दा सत्कार केला.यावेळी गिरड सर्कल मधील अनेक गावातील नागरिक,महिला ग्रामसंघ बचत गट, विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आमदार समिर कुणावार यांचा सत्कार करण्यात आला.

आमदार समिर कुणावार मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की महाराष्ट्र ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा सरकारकडून करताच हे महाविद्यालय हिंगणघाट मध्ये असे आणता येईल यासाठी सातत्याने संबंधी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना भेटून आदी ४०० बेडचे रुग्णालय हिंगणघाट येथे मंजूर करून घेतले आणि त्यांनतर आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने वर्धा जिल्हा मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे एका तालुक्याच्या ठिकाणी आणण्यात येशस्वी ठरलो आता लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जाम येथे होणार असून माझ्ये धैर्य पुर्ण होणार यांचा मला आंनद आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

गिरड गावातील येवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून माझा सत्कार व सन्मान केला यामुळे माझे मन भरून आले आहे.यापुढेही मी जनतेची सेवा करीत राहणार असे मत त्यांनी व्यक्त केली यावेळी किशोर दिघे यांनी सुध्दा उपस्थितांना मार्गदर्शन केले प्रास्ताविक अरुण मोटघरे तर आभारप्रदर्शन सरपंच राजु नौकरकर संचालन प्रशांत ठाकूर यांनी केले या कार्यक्रमाला गिरड सर्कल मधील गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Hingnghat:या सत्कार समारंभाला येशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य राहुल गाढवे, प्रशांत ठाकूर मोंटु छायले,करण अकाली, सचिन उंबरकर, गौरव पेंदाम,अर्जून अकाली ,भोला बावणे,सागर बावणे,विजय सडमाके,संदिप शिवणकर, विक्की सहारे, मंगेश दोडके, अनिल गुंडू विनोद कनाळकर, विजया तेलरांधे, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री कवीश्वर इंगोले, युवा मोर्चा उपाध्यक्ष मनोज भारस्कर , युवा मोर्चा अध्यक्ष आशिष अंड्रस्कर , आकाश मोंडे , आशिष खेडकर , गोलू भाऊ काटकर, तुषार हवाईकर, दिनेश जाधव, युवा मोर्चा महामंत्री आश्विन छोयले आदिनी सहकार्य केले.

Leave a Comment