महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी संघर्ष मोर्चा काढण्यात आला, राहुल बोंद्रे यांनी चर्चा करून बुलढाणा जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर ( rahul bondre )

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

Rahul bondre :बुलढाणा,शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा आज चिखली महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी संघर्ष मोर्चा दिनांक १८/०९/२०२४ रोजी झालेल्या शेतकरी आंदोलनात असंख्य शेतकरी आपले हक्क मागण्यासाठी एकत्र आले.

Education: ISRO मध्ये नोकरी करण्यासाठी शिक्षण काय घ्यावे, कोणत्या विषयांचे ज्ञान हवे?(ISRO)

या आंदोलनामागील उद्दिष्ट एकच होतं—शेतकऱ्यांच्या समस्यांना आवाज देऊन सरकारपर्यंत पोहोचवणे. शेतकऱ्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत:

किमान ₹७,००० प्रति क्विंटल सोयाबीन दर, त्वरित पीक विमा निधी जमा, कर्जमाफी, आणि तुषार व ठिबक सिंचनासाठी अनुदानाची तत्काळ पूर्तता!भ्रष्टाचारामुळे सरकार मौन आहे, पण शेतकऱ्यांनी ठरवलं आहे की आता त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष थांबणार नाही.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यांच्या मेहनतीचं योग्य मोल मिळालं पाहिजे. शिवसेनेचे नरू भाऊ खेडेकर, आमदार सानंदाजी, हर्षवर्धन दादा सपकाळ, आद श्याम भाऊ ऊंबाळकर, नरेंद्र भाऊ शेळके, लक्ष्मणराव घुमरे, नरेंद्र कुमार गोरे ,मा ज्योतीताई खेडेकर, डॉ इस्रार, भाई प्रदीप अंभोरे, रफिक शेठ, संजू भाऊ गाडेकर ,शिवसेना युवकचे नंदू भाऊ कराळे, अमीन सेठ, डॉक्टर भुसारी, अडवोकेट सहजाद उपस्थित होते.

Rahul bondre :आजच्या आंदोलनातून शेतकऱ्यांनी दाखवून दिलं की त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत ते शांत बसणार नाहीत. त्यांच्या मालाला योग्य भाव आणि समर्थन मिळालं पाहिजे, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी व असंख्य शेतकरी उपस्थित होते

Leave a Comment