कापुस सोयाबीन भाववाढ, कर्जमाफी, पिक विमा व बचतगट यासह विविध प्रश्नांवर उद्या फैसला..
Former :संग्रामपूर/ शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर राज्यातील अनेक संघटना एकत्रित येऊन सर्व नेते प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात होत असलेल्या शिव जनस्वराज्य मेळाव्यासाठी उद्या शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर रोजी संग्रामपूरात धडकणार आहेत.
राष्ट्रीय अध्यक्ष व्ही एम सिंग,मा खा.राजु शेट्टी,मा.आमदार शंकर अण्णा धोंडगे, सप्तखंजेरीवादक संदिपपाल महाराज, सप्तखंजेरीवादक डॉ रामपाल महाराज, उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष प्रा.प्रकाश पोफळे, मराठवाडा अध्यक्ष गजानन पाटील बंगाळे, यांच्या सह राज्यातील अनेक नेते उपस्थित राहणार
असुन कापुस सोयाबीन भाववाढ, कर्जमाफी, पिक विमा व बचतगट यासह विविध प्रश्नांवर काय निर्णय घेतात याकडे राज्याचे लक्ष लागून आहे. राज्यात सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढलेल्या शेतकरी आत्महत्या, जाणिवपूर्वक पाडलेले शेतीमालाचे भाव, बि बियाणे व खतांचे वाढलेले भाव, नोकर भरतीमधे भ्रष्टाचार, महिलांवर होणारा अत्याचार, याला आळा घालण्यासाठी व कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हा मेळावा ऐतिहासिक व महत्त्वपुर्ण मानल्या जात आहे.
या मेळाव्याला येण्यासाठी गावा गावात जणमाणसांची उत्स्फूर्तपणे तयारी दिसुन येत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे बँकेचे पिक कर्ज आहे. अशा शेतकऱ्यांना शासनाकडून कर्जमाफीचा लाभ मिळवून घेण्यासाठी कर्जमाफिचे अर्ज दाखल करण्यासाठी बहुसंख्येने शेतकरी पोहचणार असुन.
महिला बचत गटाचे रोखलेली व्याजाची रक्कम शासन निर्णयनुसार महिलांना परत मिळविण्यासाठी अंतिम स्मरणपत्र घेऊन उद्याच्या मेळाव्याला महिला बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कर्जदार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचे अर्ज व व्याजाची रक्कम परत मिळण्यासाठी महिलांसाठी अंतिम स्मरणपत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संग्रामपूरमधे प्रत्येक झेरॉक्स दुकानवर उपलब्ध करून दिले आहेत.
Former :त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जीव कि प्राण असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुर्वनियोजीत जय्यत तयारी केली असल्याने राज्यसरकारला चांगलाच घाम फोडला आहे.