लोणार येथे 16 सप्टेंबर रोजी ईद मिलादुन्नबीच्या पवित्र प्रसंगी रक्तदान शिबिराचे आयोजन ( lonar )

 

रक्तदान हे समाजातील प्रत्येक सदस्याच्या जीवनाचे रक्षण करते मो. रिजवान जड्डा

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonar :लोणार येथे ईद मिलादुन्नबीच्या पवित्र प्रसंगी मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले, इंदिरा गांधी उर्दू हायस्कूल, जामा मस्जिद चौक, लोणार येथे सोमवार 16 सप्टेंबर रोजी हा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला होता.

सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold )

जामियते उलमा ए हिंद लोणार या मुस्लिम संघटने तर्फे हा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला. उद्घाटक म्हणून शहराचे ज्येष्ठ कार्यकर्ते हाजी महेमूद सेठ़, प्रमुख पाहुणे लोणार पोलीस निरीक्षक निमिश मेहत्रे,माजी सभापती आबिद खान, एलसीपीएसचे अध्यक्ष हाजी शेख मसूद सेठ़, अल्पसंख्यांक राज्य उपाध्यक्ष इमरान खान, सीबीएससीचे प्राचार्य डॉ. कुलकर्णी, शेख फैसल आरोग्य निरीक्षक डॉ. फिरोज शाह, फिरोज़ पठाण, डॉ.मानधने, विदर्भ पोलीस अकॅडमीचे संचालक निसार शेख,पत्रकार फिरदोस पठाण, कार्यकर्ते बब्बी भाई इत्यादींची उपस्थिती लाभली.

यामध्ये 5.30 वाजेपर्यंत 105 रक्तदात्यांनी आपले अमूल्य रक्तदान केले होते. संध्याकाळ पर्यंत हा आकडा 130 पर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा जमियतचे तालुकाध्यक्ष हाजी रिजवान जड्डा यांनी व्यक्त केले होते.

संघटनेचे शहराध्यक्ष हाफिज शेख अयाज यांनी रक्तदान ही मानवतेच्या सेवा करण्याची एक महत्वपूर्ण क्रिया असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच रिज़वान खान करामत खान,वसीफ अहेमद खान, हाफिज तारीक, इज़हार खान यांनी रक्तदानाच्या महत्वाबद्दल समाजामध्ये जनजागृती केली. हाजी महेमूद सेठ़ म्हणाले की, रक्तदानामुळे आपल्याला एकमेकांच्या जीवनात थोडक्यात पण मोठा फरक घडवता येतो.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

सलग 10 वर्षांपासून हा रक्तदान शिबिर आयोजित केला जातो व प्रत्येक वर्षी 100 पेक्षा जास्तच रक्तदान होतो.
रक्तदानाचे महत्व आणि मोहम्मद पैगंबर (सल्ल.) यांच्याच विचारांचे अनुसरण करून आपण समाजात एक चांगला संदेश देऊ शकतो. असे मनोगत हाफिज़ अब्दुल राजिक यांनी व्यक्त केले.

Lonar :याप्रसंगी जमियतचे सर्व पदाधिकारी, मुस्लिम समाजातील युवा पिढी व सर्व राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांसह रिज़वान खान करामत खान, हाफिज़ तारीक, अल्ताफ हुसेन, वसीम खान सर, सखावत सर, हाफिज़ एतेशाम, ज़फर खान, मोहम्मद ज़की, फुरकान खान, हाफिज़ अनिस, जै़द व अनस यांनी या रक्तदान शिबिराच्या यशस्वीते करिता परिश्रम घेतल

Leave a Comment