Monkeypox:परदेशात भारतात परतलेल्या एका व्यक्तीला मंकीपॉक्सची (Monkeypox) लागण झाल्याची भीती असून या व्यक्तीला रुग्णालयात आयसोलेट करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.
कोविड-19 महामारीनंतर मंकीपॉक्स व्हायररसने जगाबरोबरच भारतातही चिंताजनक परिस्थिती आहे. पण या आजाराशी लढण्यासाठी सर्व तयारी पूर्ण असल्याचं आरोग्य विभागाने (Health Ministry) म्हटलं आहे.
या व्हायरसविरोधात लोकानी जागरुक राहाण्याचं आव्हानही आरोग्य विभागाने केलं आहे. हा व्हायरस वेगाने पसरत असल्याने लक्षणं ओळखून वेळीच डॉक्टरांकडे जाण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
भारतात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण सापडल्याचं आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आफ्रिकेतून आलेल्या या रुग्णात मंकीपॉक्सची लक्षणं (symptoms of monkeypox) आढळल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Monkeypox:सध्या या रुग्णावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरु आहेत. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची ओळख करण्यात आली असून त्यांनाही क्वारंटाईन करण्यात आल्याचं आरोग्यविभागाकडू