यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे
Yavalnews:तालुक्यातील परसाडे गावाच्या लोकनियुक्त सरपंच मिना राजु तडवी यांनी शासकिय जमीनीवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने अखेर त्यांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अपात्र केले असुन, या निर्णयामुळे राजकिय वर्तुळात व परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे .
पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )
या संदर्भातील वृत्त असे की , परसाडे तालुका यावल लोकनियुक्त सरपंचपदावर येथील ग्राम पंचायतच्या झालेल्या २०२२च्या निवडणुकीत मिना राजु तडवी या अटीतटीच्या निवडणुकीत अल्पमतांनी निवडून आल्या होत्या .
येथील शब्बीर कान्हा तडवी व ग्रामसेवक ग्रामपंचायत परसाडे यांनी निवडूण आलेल्या सरपंच मिना राजु तडवी यांनी गावातील शासकीय जागेवर अतिक्रमण करण्याच्या कारणावरून त्यांच्याविरुद्ध विविध प्रशासकीय यंत्रणेतुन चौकशी करीतसरपंच यांनी अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने अखेर दिनांक १२ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी लोकनियुक्त सरपंच परसाडे मिना राजु तडवी यांना अतिक्रमण प्रकरणी अपात्र करीत असल्याचे आदेश पारित केले आहे .
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निकालाबाबत बोलतांना तक्रारकर्ते शब्बीर तडवी यांनी म्हटले आहे की, सदरचे अतिक्रमण प्रकरण हे कोणतेही राजकारण व राजकीय वाद किंवा हेवेदाव्यांचा नसुन प्रशासकीय नियमाची लढाई असुन.
Yavalnews:यात आमही वरिष्ठांकडे केलेली वस्तुनिष्ठ तक्रार ही सत्य असल्याने निर्णय आमच्या बाजुला लागल्याची प्रतिक्रीया देत विजय हा सत्याचा झाला असल्याचे आदिवासी सामाजिक कार्यकर्ते व अतिक्रमण प्रकरणातील तक्रारकर्ते शब्बीर कान्हा तडवी यांनी दिली आहे .