खासदार अमर काळे,आमदार अभीजीत वंजारीच्या हस्ते बक्षिस देऊन चिमुकल्यांचा सन्मान ( amarkale )
प्रतिनिधी गुड्डू कुरेशी
amarkale:सिदी (रेल्वे) ता.७ :तान्हा पोळा कृती समितीच्यावतीने सलग विसाव्या वर्षी येथील जुन्या पोलीस ठाणापरिसरात मंगळवारी (ता.३) ला दुपारी तीन ते सहा वाजता दरम्यान आयोजित बाल तान्हा पोळा दोन हजार बालगोपालांच्या उपस्थितीने रंगत आली.
तर दोरीने ओढणारा नंदीगट,कठड्यावरील नंदीगट आणि फॅन्सी ड्रेस परिधान करनारा नंदीधारक गट अशा तिनं गटात विभागणी करुन परिक्षनातुन निवडलेल्या १०० चिमुकल्या नंदी धारकांना विशेष भेट वस्तू पुरस्कार स्वरुपात देऊन खासदार अमर काळे,आमदार अभीजीत वंजारी, माजी आमदार राजु तिमांडे,सभापती सुधीरबाबु कोठारी, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वादिले,जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य किशोर दिघे, हिंगणघाटचे माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे,श्वास संघटनेचे संस्थापक विठ्ठल गुळघाने, काँग्रेसचे प्रविन उपासे ,कामगार नेते आफताब खान आदी मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
संपूर्ण शहरातुन जवळपास दोन हजार बालगोपालानी आपला नंदी व स्वतः विवीध वेशभूषा करून सामाजिक संदेश देत भाग घेतलेल्या नंदीधारकातुन पोळा कृती समीतीनी नियुक्त केलेल्या परिक्षण मंडळातील सदस्या सुरेखा साठे,धृतीका गवळी,भारती मुळे,स्वाती गहेरवार ,अमोल गवळी यांनी निवडलेल्या तिन्ही गटातील मिळुन शंभर नंदीधारक चिमुकल्यांना भेट वस्तुचे वाटप करण्यात आले.
सहभागी दोन हजार बालगोपाल नंदी धारकांना बोजारा म्हणून आमदार तथा उत्कृष्ट संसदपटु समीर कुणावार यांच्या तर्फे टिफीन, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वादिले यांच्या कडुन रजिस्टर तर हिंगणघाट बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांच्या कडुन दिलेल्या बिस्किट पुडा आणि थैलीचे कृती समीतीच्या बोजारा समितीच्या सदस्यानी वाटप केले.
सहभागी दोन हजार बालगोपाल नंदी धारकांना बोजारा म्हणून आमदार तथा उत्कृष्ट संसदपटु समीर कुणावार यांच्या तर्फे टिफीन, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वादिले यांच्या कडुन रजिस्टर तर हिंगणघाट बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांच्या कडुन दिलेल्या बिस्किट पुडा आणि थैलीचे कृती समीतीच्या बोजारा वाटप सदस्यानी वाटप केले.
तर परिक्षण मंडळाने निवडलेल्या शंभर बाल नंदीधारकांना श्वास सेवाभावी संघटना हिंगणघाटचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल गुळघाने यांच्याकडून ट्रॉफी तसेच हिंगणघाटचे माजी नगराध्यक्षचे पंढरी कापसे यांच्याकडून शैक्षणिक साहित्याचे गिफ्ट देण्यात आले.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
त्याचप्रमाणे सिंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा,जनता दरबार सामाजिक संघटना सिंदी,केसरी नगर विद्यालया सिंदी ,कृष्ण एजन्सीचे पुरुषोत्तम व्यास, सामाजिक कार्यकर्ते सागर अंभोरे ,इंजिनीयर सतीशजी ढोक,सुनीलजी पाटेकर वर्धा, हिंगणघाटचे सचिनची चरडे,साई हार्डवेअरचे संजय तडस,भाजप शहराध्यक्ष ओमप्रकाश राठी, अजय फेब्रिकेशनचे अजय वांदीले आदी दानदात्यांकडुन पुरस्कार स्वरुपात शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
amarkale:कार्यक्रमाचे संचालन मोहन सुरकार यांनी केले. उपस्थिताचे आभार आशिष देवतळे यांनी मानले.तान्हा पोळा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी तान्हा पोळा कृती समितीच्या सर्व पदाधिकार्यानी अथक परिश्रम घेतले.