मौलाना अबुल कलाम आजाद उर्दू गर्ल्स हायस्कूल मध्ये “शिक्षकदीन” साजरा ( lonarnews )

 

लोणार तालुका प्रतिनिधी सय्यद जहीर

lonarnews:दि 5.9.2024 रोजी मौलाना अबुल कलाम आजाद उर्दू गर्ल्स हायस्कूल लोणार मध्ये शिक्षक दिवस साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय मोहम्मद गुफरान सर कुरैशी होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी शिक्षकांनी कश्याप्रकारे विद्यार्थ्यांना कसे प्रकारे घडवावे व त्यांच्या मनात शिक्षणाची आवड कशी निर्माण करायची याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.मो सुफयान सर कुरैशी यांनी ही मोलाचे मार्गदर्शन केले

. मो फुरकान सर कुरैशी यांनी आपल्या भाषणातून शिक्षक आणि शिक्षणाचे महत्व पटवून दिले. त्यांचबरोबर विद्यार्थ्यांनी नेहमी शिक्षकांचा तसेच आई वडिलांचा आदर करावा असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद गुफरान सर कुरैशी यांनी केले.

बारा वर्षांपासून चाललेले क्रीडा संकुलाचे काम कधी होईल पुर्ण ?( lonarnews )

याच वेळी शाळेमध्ये शिक्षक दिनानिमित्त अनेक कार्यक्रम राबविण्यात आले यामध्ये वर्ग १० ची विदयार्थीनी अलफीया खॉं हीने मुख्याध्यापिका म्हणून काम पाहिले तसेच शिपाई ची भूमिका वर्ग 8 चा विद्यार्थी शेख अनस यांनी हि भुमिका पार पाडली तसेच अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनी शिक्षकांच्या भूमिकेत होते.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

सदर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शेख सलमान सर. मो फरजान सर. मो फुरकान सर व इतर कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.

lonarnews:व कार्यक्रमाची सांगता व सर्वांचे आभार मुख्याध्यापक मोहम्मद गुफरान सर कुरैशी यानी मानले. यावेळी सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते

Leave a Comment