प्रतिनिधी सचिन वाघे
gharkulyojna:हिंगणघाट : हिंगणघाट तालुक्यातील पारडी (नगाजी) येथील महिलांना ५० वर्षांपासून कोणताही घरकुलाचा लाभ मिळाला नाही.
त्यामुळे घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी या महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले.
या महिलांची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने ते घर बांधू शकत नाही. त्या पडक्या घरामध्ये, कुडाकाडाच्या घरामध्ये त्यांच्या मुलाबाळांना घेऊन राहत आहेत.
सरपंच आणि सचिवांना विचारल्यावर तुमची यादी मंजुरी साठी पाठवली आहे, असे ते उत्तर देत असल्याचे महिलांनी सांगितले. त्यामुळे आमच्या अर्जाचा विचार करून आम्हाला घरकूल योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी केली.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान, या महिलांना यांचा अधिकार मिळाला पाहिजे. त्यांची मागणी ही अत्यंत रास्त आहे.
gharkulyojna:त्यामुळे या सर्व महिलांना त्यांची मागणी पूर्ण होण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करणार असल्याचे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी सांगितले.यावेळी नलू नगाजी मेश्राम, सुनीता कांबळे, गिता जगताप, संगीता जगताप, कमला पाटील, पंचशिला कांबळे, कविता साबळे, इंदिरा मांडवकर, मंगला सराटे, सिंधूबाई शेंद्रे, गिरजा शेंद्रे, वंदना कचवे उपस्थित होते…