४ सप्टेंबर च्या शिव जनस्वराज्य यात्रेत शेतकरी शेतमजुरांनी सहभागी व्हा-जिल्हाध्यक्ष उज्वल पाटील यांचे आवाहन.(Prashantdikkar)

 

Prashantdikkar:शेगाव/कापुस-सोयाबिन भाववाढ कर्जमाफी व पिकविमा सह विविध प्रश्नांवर स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात उद्या बुधवार ४ सप्टेंबर रोजी श्री क्षेत्र नागझरी येथुन शिव जनस्वराज्य यात्रेचा प्रारंभ होणार असुन या यात्रेत शेतकरी शेतमजूर व युवकांनी सहभागी व्हा.

असे आवाहन स्वाभिमानीचे जिल्हाअध्यक्ष उज्वल पाटील चोपडे यांनी केले आहे. शेतकरी,शेतमजूर,महिला बचत गट, व युवकांच्या प्रश्नावर आक्रमक लढणारे प्रशांत डिक्कर यांनी पुन्हा सरकारला आवाहन करित उद्या बुधवार दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी श्री क्षेत्र नागझरी येथुन शिव जनस्वराज्य यात्रा काढणार असल्याचा ईशारा सरकारला दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यात्रेची जय्यत तयारी केली आहे. हि जनस्वराज्य यात्रा १६ दिवसात १९१ गावात जाणार असुन कापुस सोयाबीन भाववाढ कर्जमाफी व पिकविमा सह विविध मागण्यांबाबत माजी खासदार राजु शेट्टी यांच्या उपस्थित लाखो शेतकऱ्यांच्या संख्येने शुक्रवार दि. २० सप्टेंबर रोजी संग्रामपूर तहसिलच्या मैदानावर यात्रा धडकणार आहे.

सोयाबीन भाववाढ कर्जमाफी व पिकविमा सह विविध प्रश्नांवर सरकारने निर्णायक भूमिका न घेतल्यास दि.२० सप्टेंबर च्या संग्रामपुरच्या महामेळाव्यात सरकार विरोधात क्रांतीचा नवा संग्राम होणार आहे.

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

सप्टेंबर च्या शिव जनस्वराज्य यात्रेत शेतकरी शेतमजुरांनी सहभागी व्हा-जिल्हाध्यक्ष उज्वल पाटील यांचे आवाहन.(Prashantdikkar)

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

जोपर्यंत मागण्यांबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेणार नाही तोपर्यंत लढा थांबणार नाही यापध्दतचे नियोजन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभरात केलेले आहे.

Prashantdikkar :तरी या ऐतिहासिक शिव जनस्वराज्य यात्रेत शेतकरी शेतमजूर व युवकांनी सहभागी व्हा असे आवाहन स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष उज्वल पाटील चोपडे यांनी केले आहे.

Leave a Comment