prashantdikkar:४ सप्टेंबर २०२४ पासुन श्री क्षेत्र नागझरी येथुन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सरकार वठणीवर यावे याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटना १९१ गावातुन ‘शिव जन स्वराज्य यात्रा’ काढणार असल्याचा मोठा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
शिव जनस्वराज्य यात्रा ४ सप्टेंबर नागझरी येथुन १६ दिवसात १९१ गावात भ्रमण करीत सरकारने निर्णायक भूमिका न घेतल्यास दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी मा.खा.राजु शेट्टी यांच्या उपस्थित संग्रामपूर येथे शिव जनस्वराज्य यात्रेचा महामेळावा होणार असुन सरकार विरोधात राज्यव्यापी आंदोलन पेटणार हे विशेष..
माझा मायबाप शेतकरी सुखी व्हावा. त्यांचे प्रश्न मार्गी लागावे हेच या यात्रेचे प्रमुख उद्दिष्ट आणि धोरण आहे असे मत प्रशांत डिक्कर यांनी बोलतांना व्यक्त केले.
माझ्या शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होऊन आपल्या न्याय हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटने बरोबर येऊन लढा द्यावा आणि शिव जन स्वराज्य यात्रेत सहभागी व्हावे. असे आवाहन या बैठकीतून करण्यात आले.
बातमी लाईव्ह. पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या बैठकीत कापूस, सोयाबीन भाववाढ व कर्जमाफी यांसह विविध प्रश्नांवर आंदोलनाची दिशा ठरवली गेली, तसेच संघटनात्मक बांधणीसाठी कार्यकर्त्यांना पद नियुक्त करण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वांनी एकत्र येऊन आपली संघटना हे आपले घरच आहे असे समजून काम करावे अशा सूचना नवनियुक्त आणि उपस्थित सर्वच पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
prashantdikkar::धान्य मार्केट वरचा हॉल उपबाजार समिती वरवट बकाल येथे आज कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. प्रकाश पोफळे, विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या हस्ते नवनिर्वाचित कार्यकर्त्यांना संघटनेच्या जबाबदाऱ्या देऊन पदनियुक्त करण्यात आले..
#shivjanaswarajyayatra #prashantdikkar #rajushetti #swabhimanishetkarisanghatana #jalgonjamod